शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

विष तस्करी सापांच्या मुळावर

By admin | Updated: December 19, 2014 00:13 IST

जैवसाखळी विस्कळीत : वैद्यकीयतज्ज्ञही तस्कर रॅकेटमध्ये सहभागी?

संदीप खवळे - कोल्हापूर -सर्प विष मिळविण्यासाठी सापांचा नायनाट करण्याचा राजरोस प्रकार जिल्ह्यात घडत आहे़ आदमापूर येथे सापडलेल्या तरुणांकडे दीड लिटर सर्प विष सापडल्याची घटना उघडकीस आली़ यापूर्वीही जिल्ह्यात अनेक ठिकाणी सर्पविष सापडल्याच्या घटना घडल्या आहेत़ मागील वर्षी कागल येथे दोन लिटरच्या दोन बाटल्या सापडल्या होत्या़ आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या विषाची किमत करोडोंच्या घरात आहे़ अमली पदार्थांमध्ये वापर करण्यासाठीच अशा प्रकारच्या तस्करी होत असल्याचे मत डॉक्टर आणि वन्यजीव मित्रांच्या वर्तुळातून समजते़ उच्चशिक्षित आणि वैद्यकीय ज्ञान असलेले रॅकेटच या व्यवसायात कार्यरत आहे़नाग, घोणस, मण्यार आणि फुरसे या जातीच्या सर्पांचे विष मिळविण्यासाठी काचेच्या बाटलीवर प्लास्टिकचा कागद बांधून त्यावर सर्पाला दंश करायला भाग पाडून विष मिळविण्याचा उद्योग तस्करांनी सुरू केला आहे़ आदमापूर आणि कागल येथील घटना प्रातिनिधिक उदाहरणे आहेत़ गुंगी वाढविण्यासाठी अमली पदार्थांमध्ये सर्पांच्या विषाचा वापर केला जातो, पण या विषाची तीव्रता आणि मात्रा रासायनिक प्रक्रियेद्वारा कमी केली जाते़ अमली पदार्थांच्या बाजारपेठेत सापाच्या विषाची किंमत करोडोंच्या घरात असल्यामुळे शिकारीच्या निमित्ताने सर्पाचे विष काढण्यासाठी जंगलात फिरणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे़ जंगल परिसरात राहणाऱ्या तरुणांना या तस्करीच्या जाळ्यात ओढणाऱ्यांचे रॅकेट कार्यरत आहे़ विषाचा वापर विविध रोगांसाठी होत असल्याचे भासवून अमली पदार्थांमध्ये कमी मात्रेमध्ये विषाचा वापर होत आहे़ चंदगड, राधानगरी, गगनबावडा, शाहूवाडीमधील जंगलामध्ये वीकेंडच्या निमित्ताने जंगलात विषाचे संकलन करण्यासाठीच येत असल्याची चर्चा या परिसरातील गुराख्यांमध्ये असते़विष म्हणजे सापाचा पाचक रस, सापाची जात आणि ताकद यानुसार प्रत्येक सर्पांमधून मिळणाऱ्या विषाचे प्रमाण भिन्न असते, पण जास्तीत जास्त विष मिळविण्यासाठी तस्करांकडून अशास्त्रीय पद्धतीने सर्पांचे विष काढून घेतले जाते़ त्यामुळे त्यांचे हाल तर होतात, बऱ्याचदा अशास्त्रीय पद्धतीने सर्पांना हाताळण्याच्या पद्धतीमुळे मृत्यूही ओढावले आहेत़ त्यामुळे जैव साखळी विस्कळीत होऊन पर्यावरणाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. पैशांपुढे सगळे काही फिके असल्यामुळे तस्करांना याची पर्वा नसते़ जास्तीत जास्त विष मिळविण्यासाठी सर्वच विषारी सापांना पकडून विष काढण्याचा अघोरी मार्ग तस्कर अवलंबत आहेत़रासरोसपणे सुरू असणाऱ्या अशाप्रकारच्या तस्करीकडे वन्यजीव विभागाचे असलेले दुर्लक्ष मात्र चर्चेच्या केंद्रस्थानी आहे़ ‘अँटी पॉयझनिंग’प्रामुख्याने सर्पाचा विषाचा प्रयोग ‘अँटी पॉयझनिंग’ म्हणून केला जातो़ यासाठी वैद्यक शाळांकडून शास्त्रीय पद्धतीचा वापर केला जातो़ या पद्धतीमध्ये साप पकडणे, त्याच्या जातीची नोंद ठेवणे, त्याला योग्य ते खाद्य देणे आणि त्याच्यात नैसर्गिकरीत्या तयार झालेले विष मिसळले जाते तसेच त्यावर योग्य ती रासायनिक प्रक्रिया केली जाते. अंधश्रद्धा आणि अज्ञानाबरोबरच ‘बिग मनी’साठी सर्पविषाची तस्करी वाढली आहे़ वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ अन्वये विषारी सर्पांचे हाल केल्याचे सिद्ध झाल्यास २५ हजारांचा दंड आणि सहा महिन्यांच्या कारावसाच्या शिक्षेची तरतूद आहे. - किशोर शिंदे, निसर्गमित्र