बांबवडे -डोणोली येथे तिघांवर चाकूहल्ला, तीन लाखाचा ऐवज लंपास 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 06:07 PM2021-04-09T18:07:28+5:302021-04-09T18:14:16+5:30

Crimenews Police Kolhapur : बांबवडे व डोणोली तालुका शाहुवाडी येथे झालेल्या चोरीत दोन लाख ९० हजार २५० रुपये चा मुद्देमाल चोरून चोरट्यांनी पोबारा केला. यामध्ये विरोध करणाऱ्या तिघांवर चोरट्यांनी चाकू हल्ला केला. यामध्ये ते किरकोळ जखमी झाले .घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, शाहूवाडीचे प्रभारी उपधीक्षक आर. आर. पाटील यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घटनेची नोंद शाहूवाडी पोलिसात झाली आहे.

Three stabbed at Bambawade-Donoli, three lakh looted Lampas | बांबवडे -डोणोली येथे तिघांवर चाकूहल्ला, तीन लाखाचा ऐवज लंपास 

डोणोली येथे जखमी झालेले लक्ष्मी शेळके व आनंदा शेळके

googlenewsNext
ठळक मुद्देबांबवडे -डोणोली येथे तिघांवर चाकूहल्लातीन लाखाचा ऐवज लंपास 

बांबवडे : बांबवडे व डोणोली तालुका शाहुवाडी येथे झालेल्या चोरीत दोन लाख ९० हजार २५० रुपये चा मुद्देमाल चोरून चोरट्यांनी पोबारा केला. यामध्ये विरोध करणाऱ्या तिघांवर चोरट्यांनी चाकू हल्ला केला. यामध्ये ते किरकोळ जखमी झाले .घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, शाहूवाडीचे प्रभारी उपधीक्षक आर. आर. पाटील यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घटनेची नोंद शाहूवाडी पोलिसात झाली आहे.

घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार चोरट्यांनी रात्री १ च्या दरम्यान डोणोली येथील लक्ष्मी आनंदा शेळके यांच्या घरात घुसून त्यांच्यावर चाकू हल्ला केला. हातातील सोन्याच्या पाटल्या कटरने कट करून चोरट्यांनी पाकिटातील ७५० रुपये रोख असा एकूण १ लाख २० हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

गोंधळ ऐकून जागे झालेल्या आनंदा दादू शेळके यांनी चोराला पकडले. परंतु दुसर्‍या चोरांनी त्याच्या हातावर चाकूचा वार केला व पळून गेले. या चोरांनी डोणोली येथेच प्रदीप सुदाम पाटील व विजय शहाजी कांबळे यांच्या घरात चोरी करण्याचा प्रयत्न केला. परंतु घरातील लोक जागे झाल्याने त्यांनी आरडाओरडा केला. त्यामुळे चोरांचा येथे चोरी करण्याचा प्रयत्न फसला.

या घटनेनंतर रात्री २.३० च्या दरम्यान चोरांनी आपला मोर्चा बांबवडेकडे वळवला. येथे सरूड रोडवरील विजया महादेव पाटील या वृद्धेच्या घराचे दार उघडून तिच्यावर चाकू हल्ला केला व रोख रकमेसह एकूण १ लाख ६९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

या संपूर्ण घटनेने बांबवडे व डोणोली परिसरात एकच खळबळ उडाली. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, शाहुवाडी विभागाचे पोलीस उपअधीक्षक आर आर पाटील, पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांच्यासोबत उपविभागीय पोलिस अधिकारी यांचे विशेष पथक, सायबर पथक, श्वान पथक ,फॉरेन्सिक लॅब पथक ,ही पथके चोरीचा छडा लावण्यासाठी तैनात झाली होती. पुढील तपास शाहुवाडी पोलिस करत आहेत.

सासऱ्याच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला.

डोणोली येथील लक्ष्मी आनंदा शेळके यांच्यावर एका चोराने व त्यांच्या सुनेवर दुसऱ्या चोराने झडप घातली होती. गोंधळ ऐकून जागे झालेल्या आनंद शेळके यांनी सुनेवर हल्ला करणाऱ्या चोरास पकडले. तोपर्यंत दुसऱ्या चोराने उठून त्यांच्यावर चाकू हल्ला केला व पळून गेले. सासऱ्याच्या धाडसाने मोठा अनर्थ टळला. 
 

Web Title: Three stabbed at Bambawade-Donoli, three lakh looted Lampas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.