शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत मशिदीत अंदाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
2
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
3
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
4
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
6
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
7
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
8
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
9
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
10
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
11
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
12
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
13
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
14
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
15
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
16
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
17
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
18
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
19
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
20
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: जांभळीतील जिम ट्रेनर खूनप्रकरणातील आरोपी चोवीस तासात गजाआड, इचलकरंजीच्या तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 12:44 IST

खुनाचे कारण आज स्पष्ट होण्याची शक्यता

शिरोळ : जांभळी (ता. शिरोळ) येथील जिम ट्रेनर संदीप भाऊसाहेब पाटील (वय ४३) याच्या खूनप्रकरणी पोलिसांनी गुरुवारी रात्री इचलकरंजी येथील तिघा आरोपींना अटक केली. मुकेश बाळू जावेर (वय ३२, रा. दत्तनगर, शहापूर), रवींद्र रतन कांबळे (३५, रा. आंबेडकर नगर) व रतन मोहन कांबळे (३३, रा. शास्त्री सोसायटी) अशी आरोपींची नावे आहेत. दरम्यान, खून नेमका कोणत्या कारणातून झाला याचा लवकरच उलगडा होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

जांभळी येथील संदीप पाटील यांचा बुधवारी रात्री जयसिंगपूर-जांभळी मार्गावरील कुरडे मळ्याजवळ दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने वर्मी वार करून खून केला होता. घटनेनंतर संशयित पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्यांची चारचाकी गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या चरीत अडकल्याने गाडी सोडून अंधाराचा फायदा घेत ते पसार झाले होते.

पोलिसांनी कारच्या मालकाचा शोध घेऊन तपास यंत्रणा राबवली. चार पथकांद्वारे संशयितांची शोध मोहीम राबविण्यात आली. खुनाच्या घटनेत चौघांचा समावेश असल्याची माहिती पुढे आली. त्यातील तिघा आरोपींना रात्री अटक केली असून नेमका खून कोणत्या कारणातून झाला याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी पत्रकारांना दिली.

चोवीस तासांत आरोपी गजाआड

घटनास्थळी मिळालेल्या कारवरून संशयितांपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश मिळाले. आरोपींनी हे वाहन भाड्याने घेतले होते. पोलिस अधीक्षक योगेश कुमार, पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे, पोलिस उपनिरीक्षक गिरीश शिंदे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी गुन्हा उघडकीस आणला.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Gym Trainer Murder: Three Arrested Within 24 Hours

Web Summary : Police arrested three Ichalkaranji residents within 24 hours for the murder of gym trainer Sandeep Patil in Jambhali. The suspects were caught after their getaway car got stuck. Police are investigating the motive behind the crime. The swift action led to the arrest.