शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

प्रस्थापित राजकीय पक्षांना तिसरा पर्याय

By admin | Updated: November 20, 2015 00:26 IST

लक्ष्मण मानेंची माहिती : ‘इंडियन सोशलिस्ट रिपब्लिकन काँग्रेस’ला आयोगाची मान्यता

कोल्हापूर : सध्याच्या राजकीय पक्षांना कोणतीही विचारसरणी राहिलेली नाही. त्यांची धोरणे एकसारखी आणि सर्वसामान्य जनतेला वेठीस धरणारी आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रस्थापित राजकीय पक्षांना आता ‘इंडियन सोशलिस्ट रिपब्लिकन काँग्रेस’ या पक्षाद्वारे तिसरा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. या पक्षाला भारत निवडणूक आयोगाची मान्यता मिळाली आहे, अशी माहिती पक्षाचे अध्यक्ष लक्ष्मण माने यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.अध्यक्ष माने म्हणाले, देशातील सध्याचे राजकीय पक्ष हे एकसारखेपणाने कार्यरत आहेत. त्यांना पर्याय म्हणून आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी ‘इंडियन सोशलिस्ट रिपब्लिकन काँग्रेस’ कार्यरत राहील. लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, विज्ञाननिष्ठा ही या पक्षाची मूल्ये आहेत. एस.टी. बचाव, डोनेशनशिवाय शिक्षण, शेती बचाव आणि जाती हटाव अशी त्रिसूत्री घेऊन आम्ही कामाला सुरुवात करणार आहोत. यात एस. टी. बचावसाठी नागरिकांना पहिल्यांदा एस.टी.तून प्रवास करण्याची विनंती केली जाईल. सर्वसामान्यांना शिक्षण मिळावे यासाठी डोनेशनला विरोध करण्यात येईल. खासगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण उधळून लावणे; तसेच समाजवादी समाजरचनेसाठी आग्रही उपक्रम राबविले जातील. जातिअंताची लढाई बळकट केली जाणार आहे. आमचा पक्ष भारतीय नागरिकांचा आहे. यात जात, धर्म, पंथ, लिंग असा कोणताही भेदभाव केला जाणार नाही. पहिल्या टप्प्यात आंदोलन आणि सभासद नोंदणी हाती घेतली जाणार असून, लवकरच त्याची सुरुवात केली जाईल. या पत्रकार परिषदेस पक्षाचे उपाध्यक्ष मच्छिंद्र जाधव, अ‍ॅड. पंडितराव सडोलीकर, जगन्नाथ जाधव, सज्जनसिंह चितोडिया, विलास तमाईचीकर, समशेरसिंह कलानी, पप्पूसिंग चितोडिया उपस्थित होते. (प्रतिनिधी)पक्षाचे काम अधिकृतपणे सुरू होणार सन २०१४ मध्ये राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी पुण्यात ‘इंडियन सोशलिस्ट रिपब्लिकन काँग्रेस’ पक्षाची स्थापना केली. मात्र, पक्षाची नोंदणी झाली नसल्याने त्याची अधिकृतपणे सूचना केली नव्हती. नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर भारत निवडणूक आयोगाने ३ नोव्हेंबरला पक्षाला मान्यता दिली आहे. त्यानुसार आता पक्षाचे अधिकृतपणे काम सुरू होणार आहे.