शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
2
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
3
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
4
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
5
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
6
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
7
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
8
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
9
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
10
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
11
PM मोदींच्या आवाहनाला गडकरींचाही प्रतिसाद, बसने प्रवास करत केली पालखी महामार्गाच्या कामांची पाहणी; दौरा सुरू असतानाच...
12
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
13
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
14
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
15
PCOS नाही, आता PMOS! ८ पैकी १ ‘या’ समस्येने त्रस्त; १७ कोटी महिलांच्या आरोग्यावर थेट परिणाम
16
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
17
मासिक शिवरात्रि व्रत २०२६: महादेव मनोकामना पूर्ण करतील, यश मिळेल, सुख लाभेल; ‘असे’ करा व्रत!
18
Travel : अवघ्या २५ हजारांत करा 'भारताच्या स्कॉटलँड'ची ट्रिप! बजेट प्लॅनिंगसाठी फॉलो करा 'या' खास टिप्स
19
Video - मुलींना बेदम मारलं, मुलाला उलटं टांगलं; शिक्षक झाला हैवान, शाळेतील धक्कादायक प्रकार
20
Instagram अकाउंट अचानक बॅन झालंय? घाबरू नका! 'या' सोप्या ट्रिकने मिनिटांत होईल रिकव्हर
Daily Top 2Weekly Top 5

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti: छत्रपती संभाजी महाराजांच्या सुटकेसाठी झाला होता लढा

By संदीप आडनाईक | Updated: May 14, 2026 14:15 IST

अस्सल कागदपत्रांच्या आधारे इतिहासावर नवा प्रकाश

संदीप आडनाईक

कोल्हापूर : मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती संभाजी महाराज यांच्या अटकेनंतर त्यांना सोडवण्याचा प्रयत्न झाला नव्हता, अशी इतिहासातील समजूत आहे. मात्र, सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा येथे त्यांच्या सुटकेसाठी लढा झाल्याचे संदर्भ स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचे सल्लागार आणि इतिहास अभ्यासक दत्ताजी नलावडे यांनी पुढे आणले आहेत.

छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाचा सरदार शेख निजाम ऊर्फ मुकर्रबखान याने इ. स. १६८९ मध्ये संगमेश्वर येथे पकडून बहादूरगड (आताचे धर्मवीरगड, मौजे पेडगाव, ता. श्रीगोंदा) येथे नेले. त्यांना लवकर मिरज प्रांतात आणण्यासाठी कोल्हापूरमार्गे न नेता वाघबीळ, भेडसगावमार्गे शिराळ्यास आणले. एक मुक्काम करून पेठमार्गे तो पुढे रवाना झाल्याचे संदर्भ आहेत. शेखची छावणी कोल्हापूरला असली, तरी अंमल संभाजीराजांचा होता; त्यामुळे धोका न पत्करता शेख याने ही आडवाट पकडली;

परंतु त्याच्या २५ हजारांच्या सैन्याला बत्तीस शिराळे येथील तुळाजी निकम देसाई आणि अप्पाजी दीक्षित यांची २००-२५० ची तुकडी सामोरी गेली. महाशिवरात्रीच्या आधी चार-पाच दिवस शिराळ्याच्या भुईकोट किल्ल्यावरून संभाजीराजांना सोडविण्याचा त्यांनी अयशस्वी प्रयत्न केला; पण ते शेख निजाम याच्या तावडीत सापडले. त्यांनी त्यांचा शिरच्छेद केला.

अप्पाजींच्या वंशजाला जमीन इनाम

ही घटना नंतर राजाराम महाराजांच्या निदर्शनास आली, तेव्हा त्यांनी शिराळ्याजवळील कणदूर गावी अप्पाजींच्या वंशजाला जमीन इनाम दिली, ती अद्यापही या कुटुंबाकडे आहे, याबाबत त्यांचे १० वे वंशज श्रीकृष्ण रघुनाथ दीक्षित यांच्याकडे दाखले आहेत.

जुन्या नोंदी

संभाजीकालीन पत्रसार संग्रहातील (१६०२ ते १६१०) नोंदीनुसार तुळाजी निकम देसाई (देशमुख) बत्तीस शिराळे येथील संभाजीराजांचे अंमलदार होते. त्यांनीच हा लढा दिल्याचा वस्तुस्थितीजन्य पुरावा संशोधकांना मिळाला आहे. १८३४ च्या इनाम कलेक्शनमध्ये यासंदर्भात काही पुरावे सापडले आहेत.

नमुने तपासणीसाठी पुराभिलेखागाराकडे

कोडोली येथील इतिहास अभ्यासक प्रशांत देशमुख यांनी सहकारी अभ्यासक अरविंद भोसले यांच्या मदतीने दत्ताजी नलावडे यांनी शिराळ्यातील भुईकोट किल्ल्याची पाहणी केली आहे. तेथे तीन वीरगळ आढळल्याची माहिती त्यांनी दिली. माती आणि दगडांचे नमुने तपासणीसाठी पुराभिलेखागाराकडे पाठविले आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Battle fought for Chhatrapati Sambhaji Maharaj's release: Historical evidence.

Web Summary : A battle was fought in Batis Shirala to free Chhatrapati Sambhaji Maharaj. Tulaji Nikam Desai and Appaji Dixit led the fight against Aurangzeb's army, but failed. Rajaram Maharaj rewarded Dixit's family with land.