शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

जादा ‘एफएसआय’ देण्याचा निर्णय नाही

By admin | Updated: November 29, 2015 01:01 IST

नितीन करीर : सांगलीचा आराखडा लवकरच

सांगली : राज्यातील १४ ‘ड’ वर्ग महापालिकांना जादा एफएसआय देण्याचा कोणताही निर्णय झाला नाही, अशी माहिती नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर यांनी शनिवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना दिली. ते म्हणाले की, जादा एफएसआयचा (चटई निर्देशांक) निर्णय झाला असता, तर मला त्याची कल्पना असती. असा कोणताही निर्णय झाला नाही. जादा एफएसआय आणि टीडीआरची मागणी प्रस्तावित आहे. याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. छोट्या नऊ मीटरपेक्षा कमी रुंदीच्या रस्त्यालगत टीडीआर दिला जाणार नाही. रस्त्यांचे जसजसे रुंदीकरण होईल आणि शहराचा विकास होईल त्याप्रमाणे एफएसआय व टीडीआरबाबत निर्णय घेतला जाईल. सांगलीच्या विकास आराखड्याबाबत ते म्हणाले की, आराखड्याच्या मंजुरीचे काम अंतिम टप्प्यात आहे. सूचना व हरकतींवरील सुनावणी होऊन संबंधित अधिकाऱ्यांचा अहवाल शासनाकडे सादर झालेला आहे. आता ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. लवकरच सांगलीचा विकास आराखडा मंजूर होईल. समान नियमावलीबाबतची अधिसूचना नगरविकासचे अवर सचिव संजय सावजी यांनी गत आठवड्यात १९ नोव्हेंबर रोजी निर्गमित केली होती. (प्रतिनिधी)