शहरं
Join us  
Trending Stories
1
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
2
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
3
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
4
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
5
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
6
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
7
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
8
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
9
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
10
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
11
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
12
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
13
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
14
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
15
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
16
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
17
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
18
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
19
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
20
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
Daily Top 2Weekly Top 5

प्रशांत कोरटकर'वर कायदेशीर कारवाई होईपर्यंत लढाई सुरू राहील; अटकेनंतर इंद्रजित सावंतांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 20:11 IST

Prashant Koratkar Arrested: प्रशांत कोरटकर याला पोलिसांनी अटक केली आहे.

Prashant Koratkar Arrested: इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकावणारा प्रशांत कोरटकर गेल्या काही दिवसापासून फरार आहे. दोन दिवसापूर्वा प्रशांत कोरटकर देश सोडून फरार झाल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान, आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. प्रशांत कोरटकर याला पोलिसांनीअटक केली आहे. पोलिसांनी तेलंगणा येथून कोरटकर याला ताब्यात घेतले आहे. यावर आता इंद्रजित सांवत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

मोठी बातमी! प्रशांत कोरटकरला अटक; तेलंगणातून पोलिसांनी घेतले ताब्यात

इंद्रजित सावंत म्हणाले, अशा चिल्लर माणसाने पोलिसांना तंगवातंगवी केली ही मोठी गोष्ट आहे. एक महिना सर्व शिवप्रेमी कोरटकरला अटक करण्याची मागणी केली. मात्र, कोरटकरला पाठिंबा दिला त्यांचे आभार पोलिसांनी चांगले काम केले, असंही इंद्रजित सावंत म्हणाले. 

"वकिलांनी चांगली बाजू मांडली. विकृत व्यक्तीला अटक केली याचे समाधान आहे,या कोरटकरला कायदेशीर कारवाई होईपर्यंत लढाई सुरू राहील. उच्च न्यायालयातही जामीन नाकारला आहे. त्याच्याकडे आता पर्याय नव्हता. तांत्रिक पुरावे जे आहेत ते पोलिसांकडे जमा केले आहेत. या लोकशाहीत त्याच्यावर कारवाई होईल, यावर माझा विश्वास आहे, असंही इंद्रजित सावंत म्हणाले. 

"प्रशांत कोरटकरला कोण मदत करत होतं, तो महिनाभर कुठे होता?, असा सवालही सावंत यांनी केला. कोल्हापुरातील कोणत्या अधिकाऱ्यांची मदत तो घेत होता हे समोर यायला पाहिजे. त्याला वाचवणारी यंत्रणा कार्यान्वित होती त्याचा शोध घ्यावा. वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्याचा चेहरा समोर आला पाहिजे, ती प्रवृत्ती कोण हे समोर आले पाहिजे, अशी मागणीही सावंत यांनी केला. 

इंद्रजित सावंत म्हणाले,  सुनावणीच्या एक तास अगोदर अटक झाली, हा योगायोग आहे की ठरवून आहे हे समोर आले पाहिजे, असा संशय सावंत यांनी व्यक्त केला. जो सत्य इतिहास बाहेर काढला जातो, त्याला विकृत मंडळी कडून त्रास दिला जातो, असंही सावंत म्हणाले. 

महाराजांवर खालच्या थरात जाऊन बोलतात त्यांच्यावर कारवाई व्हावी

इंद्रजित सावंत म्हणाले, आम्ही सत्य इतिहास सांगतो, कागदपत्रे जे बोलतात ते आम्ही सांगतो, स्वतःच सांगत नाही.पण काही विकृत माध्यमातून बोलतात, समोर कधी येत नाहीत. महाराष्ट्रात कोणतेही सरकार आले तर ते शिवप्रेमी असतात.पण छत्रपती शिवाजी महाराजांवर खालच्या थरात जाऊन बोलतात त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी अशी मागणी इंद्रजित सावंत यांनी केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliceपोलिसArrestअटक