शहरं
Join us  
Trending Stories
1
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
2
Vladimir Putin to Visit China: ट्रम्प यांच्यानंतर पुतिन चीनला भेट देणार! शी जिनपिंग यांच्यासोबत 'या' मुद्द्यांवर होणार द्विपक्षीय चर्चा
3
Twisha Sharma : "दीदी, या मला २४ तास कंट्रोल करतात"; मृत्यूच्या अवघ्या १० मिनिटांपूर्वी ट्विशाने पाठवला होता मेसेज!
4
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२६, आर्थिक लाभाची संधी, वाणी वर संयम ठेवावा लागेल
5
१ जूनपासून महिलांच्या खात्यावर येणार ३ हजार ; प. बंगालच्या नव्या सरकारचा आश्वासनपूर्तीचा धडाका
6
अमेरिकेत मशिदीत अंधाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
7
मोटेगावकरने स्वतःच्या मुलासाठीच फाेडला पेपर? नऊ दिवसांची कोठडी, सीबीआयचा दावा; हस्तलिखित नोट्सच्या माध्यमातून पुरवले प्रश्न व उत्तरे
8
एक हजारावर विद्यार्थ्यांकडून पेपर खरेदी; ‘सीबीआय’ला संशय : नागपूरमधील ‘आलोक’ आता रडारवर
9
साखरपुड्याला जाण्यासाठी ट्रकमध्ये बसले ६० जण; कंटेनरची धडक, १३ ठार
10
सीबीआय पथक लातूर शहरात ठाण मांडून; कोचिंग क्लासेस परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात  
11
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी रणसंग्राम; १८ जूनला निवडणूक होणार
12
वंदना सूर्यवंशी यांची विभागीय चौकशी प्रारंभ, मुंबई मुद्रांक जिल्हाधिकारी असताना ४९.३१ कोटींचे शासनाचे केले हाेते नुकसान
13
एसटी प्रवास महागणार, डिझेल दरवाढीचा प्रवाशांना माेठा फटका
14
एक डॉलर ९६.३५ रुपयांना...! खिसा सांभाळून ठेवा, महागाई पाेहाेचणार उच्चांकावर
15
बाजारात ट्रम्प यांचा ‘शेअर खेळ’, तीन महिन्यांत ३,७०० शेअर व्यवहार
16
संपादकीय: या कॅन्सरला ‘नीट’ रोखा, तीन दशकांत अक्षरशः खोबरे झाले
17
भारत-पाकमधून वाहणाऱ्या नद्यांचे पाणी कुणाचे? 
18
राजनैतिक थकव्याने एकाकी इराणला भारताचा(च) आधार!
19
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
20
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
Daily Top 2Weekly Top 5

प्रभाग रचनेचे अधिकार निवडणूक आयोगानेच शासनाला दिले, सरकारी वकिलांनी मांडली बाजू; आजही सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 12:07 IST

राज्य निवडणूक आयोग स्वतंत्र असला तरी आयोगाची म्हणून स्वतंत्र यंत्रणा नाही

कोल्हापूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी प्रभाग रचनेची प्रक्रिया राबविण्याचे अधिकार राज्य निवडणूक आयोगानेच महाराष्ट्र शासनाला दिले आहेत, असा युक्तिवाद सरकारी वकील ॲड. अनिल साखरे यांनी मंगळवारी केला. आता या प्रकरणी पुन्हा आज (बुधवारी) दुपारी अडीच वाजता सर्किट बेंचमध्ये सुनावणी घेण्यात येणार आहे.

सोमवारी झालेल्या सुनावणीमध्ये ॲड. श्रीकृष्ण गनबावले आणि ॲड. ऋतुराज पवार यांनी प्रभाग रचनेचा अधिकार राज्य शासनाला नसल्याचा युक्तिवाद केला होता. यामुळे निवडणुका पारदर्शी पद्धतीने होण्यालाच बाधा पोहोचत असल्याची मांडणी त्यांनी केली होती. त्यांची अपूर्ण मांडणी त्यांनी मंगळवारी पूर्ण केली. झालेली प्रभाग रचना मोघम आदेशाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. प्रभाग रचनेच्या मार्गदर्शक सूचना पाहता राजकीय हस्तक्षेपासाठी वाव असल्याचे स्पष्ट होते.

हे म्हणणे खोडून काढताना सरकारी वकील ॲड. अनिल साखरे यांनी हा मुद्दाच नसल्याचे सांगितले. राज्य निवडणूक आयोग स्वतंत्र असला तरी आयोगाची म्हणून स्वतंत्र यंत्रणा नाही. त्यामुळे राज्य शासनाची यंत्रणा वापरूनच प्रभाग रचना केली जाते. याबाबत रीतसर आयोगाने याबाबतचे अधिकार विभागीय आयुक्तांसह, जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. रीतसर नियमाप्रमाणे जी प्रक्रिया राबविणे आवश्यक आहे तीच प्रक्रिया या ठिकाणी राबविण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आयोगाने दिलेल्या अधिकाराचा वापर करूनच विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी ही प्रक्रिया योग्य पद्धतीने राबविली आहे.

यानंतर राज्य निवडणूक आयोगाचे वकील ॲड. अतुल दामले यांनी आपल्या युक्तिवादाला सुरुवात केली. परंतु, वेळ संपल्याने आता पुन्हा आज (बुधवारी) दुपारी अडीच वाजता ही सुनावणी घेण्यात येणार आहे. आज या याचिकेबाबत निकाल लागण्याची शक्यता वाटल्याने ग्रामीण भागातून अनेक जण याबाबत ‘लोकमत’कडे विचारणा करीत होते.