शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
4
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
5
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
7
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
8
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
9
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
10
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
11
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
12
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
13
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
14
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
15
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
16
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
17
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
18
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
19
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
20
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
Daily Top 2Weekly Top 5

डिजिटल फलकांवरून तणाव

By admin | Updated: October 20, 2015 00:14 IST

इचलकरंजीचा प्रकार : उपनगराध्यक्ष व माजी नगरसेवकांच्या समर्थकांत वाद, उपअधीक्षकांच्या हस्तक्षेपाने अनर्थ टळला

इचलकरंजी : शहरात अनधिकृत डिजिटल फलकांमुळे निर्माण होणाऱ्या वादाने पुन्हा डोके वर काढले आहे. शहापूर परिसरात लावलेल्या फलकांवरून उपनगराध्यक्ष रणजित जाधव व माजी नगरसेवक उदयसिंह पाटील या दोघांमध्ये निर्माण झालेल्या वादाने तेथे तणाव निर्माण झाला होता. दोघांच्या समर्थकांचा जमाव समोरासमोर आल्याने स्फोटक स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे पोलीस उपअधीक्षक विनायक नरळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन हस्तक्षेप केला आणि पुढील अनर्थ टळला. याबाबत नगरपालिका व घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी, नगरपालिकेने अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार यांच्या मार्गदर्शनाखाली अनधिकृत फलकांच्या विरोधात मोहीम सोमवारी सकाळपासून चालू केली. पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने शिवाजीनगर पोलीस ठाण्याजवळील एक लोखंडे खोके जप्त केले. त्यानंतर सुंदरबागेजवळील एका नगरसेवकाच्या छबीचे डिजिटल फलक जप्त केले. शिवाजी पुतळा चौकात असलेल्या एका सभापतीकडून शुभेच्छा देणारे फलक काढून टाकले. त्यानंतर हे पथक सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास शहापूर येथे गेले असताना तेथील माजी नगरसेवक उदयसिंह पाटील यांच्या समर्थकांचा डिजिटल फलक हलविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तेव्हा पाटील यांचे समर्थक तेथे जमले व त्यांनी फलक हलविण्यास मज्जाव केला, तर तिथून जवळच असलेले उपनगराध्यक्ष रणजित जाधव यांचे अनधिकृत फलक हलविण्याची मागणी केली. हा प्रकार समजताच जाधव यांचेही समर्थक तेथे जमले. त्यांनी परस्परांचे फलक हटविण्याची मागणी केली. यामुळे घटनास्थळी वाद निर्माण होऊन तणाव निर्माण झाला. तेथे मोठ्या प्रमाणात लोक जमल्याने गर्दी झाली. त्यामुळे शहापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सतीश पवार व उपअधीक्षक नरळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. उपअधीक्षक नरळे यांनी हस्तक्षेप करून दोघांचेही फलक उतरले जातील, असे सांगितले. त्याप्रमाणे अनधिकृत फलक उतरल्यानंतर तेथील दोन्ही समर्थक जमाव पांगले आणि तणावही निवळला. (प्रतिनिधी)हलगर्जी : अनधिकृत फलकांवर कारवाई नाहीशहरामध्ये यापूर्वी शुभेच्छा फलक लावण्यावरून अनेकदा वाद निर्माण झाले आहेत. या प्रकारातून विक्रमनगरात खून झाल्याचा प्रकारही घडला आहे. अनधिकृत डिजिटल फलकांच्या विरोधात नगरपालिकांनी तत्परतेने कडक कारवाई करावी, अशा आशयाचे आदेश उच्च न्यायालयाचे आहेत. असे असतानाही इचलकरंजी नगरपालिकेकडून मात्र याबाबत हलगर्जीपणा केला जात असल्याबद्दल नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.