शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

प्रवृत्ती, राजकीय वर्चस्वाची लढाई

By admin | Updated: October 9, 2014 23:02 IST

कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावर वर्चस्व कुणाचे, हे ठरविणारी ही निवडणूक

विश्वास पाटील - कोल्हापूर -  दक्षिण मतदारसंघातील निवडणूक माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील विरुद्ध भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांच्यापेक्षा ती सतेज पाटील विरुद्ध आमदार महादेवराव महाडिक यांच्यातील राजकीय संघर्ष या टप्प्यावर येऊन ठेपली आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावर वर्चस्व कुणाचे, हे ठरविणारी ही निवडणूक आहे. महाडिक यांची सोयीनुसार बदलत जाणारी राजकीय भूमिका हा या लढतीतला प्रचाराचा मुख्य मुद्दा बनला आहे.या लढतीचे चित्र बऱ्यापैकी स्पष्ट झाले आहे. मतदानाचा दिवस जवळ येईल तसा या प्रचारातील विखार वाढणार आहे. आताही एकमेकांची उणीदुणी काढणे सुरू आहे. यापुढे आणखी कोणती बदनामीची अस्त्रे बाहेर काढणार याविषयी मतदारांत उत्सुकतेपेक्षा भीतीच आहे. ‘दक्षिण’ची गतनिवडणूकही राज्यात गाजली. लोकसभा निवडणुकीत सतेज पाटील व खासदार धनंजय महाडिक यांच्यात मनोमिलन झाल्याने यंदा फारशी चुरस असणार नाही, असे चित्र काही दिवसांपर्यंत होते; परंतु मुलास सत्तेचे पद दिले नाही म्हणून आमदार महाडिक यांचा अहंकार दुखावला व त्यातून महाडिक-सतेज पाटील यांच्यातील संघर्ष नव्याने उफाळून आला. आता आमदार महाडिक, खासदार धनंजय महाडिक विरुद्ध सतेज पाटील अशी ही लढाई आहे. सुरुवातीच्या टप्प्यात खासदार आपण धर्मसंकटात असल्याचे सांगत होते; परंतु त्यांनीही सतेज पाटील यांनी केलेल्या मदतीवरच प्रश्नचिन्ह लावले. सतेज पाटील यांची विजयासाठी मदत झाली, असे जाहीरपणे सांगणारे खासदार महाडिक आता त्याच्या बरोबर उलटे बोलत आहेत. त्यांच्या पत्नी अरुंधती महाडिक ह्या भाजपच्या व्यासपीठावरून पती धनंजय यांना ‘राष्ट्रवादी’चा खासदार म्हणून निवडून दिल्याबद्दल आभार मानत आहेत. स्वाभिमानी जनतेने खासदार महाडिक यांना निवडून दिले, त्याचे श्रेय कुणी घेऊ नये, असे त्यांचे म्हणणे. मतदार हे सगळे पाहत आहे, वाचत आहे. तो प्रतिक्रिया देत नाही; परंतु जे सुरू आहे त्याबद्दल त्याचीही काही भूमिका आकार घेत आहे. तीच या मतदारसंघाचा आमदार कोण हे निश्चित करणारी आहे. उमेदवार म्हणून अमल महाडिक यांचा प्रचाराचा सगळा रोख नकारात्मक आहे. सतेज पाटील यांनी हे केले नाही अशा अनेक प्रश्नांची यादीच रोज वाचून दाखवित आहेत. अमल यांचा भाजपमधील प्रवेश २५ सप्टेंबरला झाला. त्याच्याअगोदर राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार होते. ते स्वत:ही त्या पक्षाचेच नेते होते. मग जे प्रश्न आता ते वाचून दाखवित आहेत, ते सोडविण्यासाठी त्यांनी काय ताकद लावली हे कुणीच सांगायला तयार नाही. आमदार महाडिक यांनी आमदार म्हणून त्यासाठी काय प्रयत्न केले व या मतदारसंघासाठी अमल महाडिक यांच्या मनात विकासाचा कोणता आराखडा आहे हे जनतेला समजत नाही. प्रा. जयंत पाटील यांच्यासह काही मंडळी जे आरोप करत सुटली आहेत, त्यात समाजहितापेक्षा राजकीय सूड ही भावना जास्त आहे. मतदारसंघातील सध्याचा माहौल तरी असा आहे. शिवसेनेचे विजय देवणे अपुऱ्या साधनांसहमतदारांपर्यंत जाऊन भूमिका सांगत आहेत. सतेज पाटील यांच्यावर जुन्याच टीकेचा रोख अधिक तिखटपणे सुरूझाल्याने तेदेखील हैराण झाले आहेत.कोल्हापूर दक्षिण एकूण मतदार ३,0७,६४९प्रचारातील मुद्देमहाडिक यांची बदलती राजकीय भूमिकालोकसभेतील पाठिंब्याचे राजकारणथेट पाईपलाईनवरून आरोप-प्रत्यारोपऊस आंदोलनातील नाराजीराजकारणाचे गुन्हेगारीकरण