शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

महापौरांसह सातजणांना तात्पुरता दिलासा

By admin | Updated: July 2, 2016 00:56 IST

जातवैधता प्रमाणपत्र : मनपाला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश

मुंबई : कोल्हापूर महापालिकेच्या महापौर अश्विनी रामाणे यांच्यासह सात नगरसेवकांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरविण्याच्या जात पडताळणी समितीच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवरील सुनावणी उच्च न्यायालयाने दोन आठवडे तहकूब केली. महापालिकेला यासंदर्भात भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिले. त्यामुळे महापौरांसह नगरसेवकांना दोन आठवड्यांचा तात्पुरता दिलासा मिळाला. न्यायाधीश शंतनू केमकर व एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी झाली.काँग्रेसच्या नगरसेवक व महापौर अश्विनी रामाणे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती वृषाली कदम, डॉ. संदीप नेजदार, दीपा दिलीप मगदूम; तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन पाटील, ताराराणी आघाडीचे नीलेश देसाई आणि भाजपचे संतोष गायकवाड यांचे जातवैधता प्रमाणपत्र जात पडताळणी समितीने ९ मे रोजी अवैध ठरविले. त्यांनी खोटी जात दाखविल्याचे समितीने म्हटले आहे. त्यानंतर १० मे रोजी कोल्हापूरच्या महापालिका आयुक्तांनी जात पडताळणी समितीच्या आदेशावरून महापौर रामाणे यांच्यासह सात नगरसेवकांना अपात्र ठरविले. सातही नगरसेवकांनी जात पडताळणी समिती व आयुक्तांच्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिले. याचिकांवरील गेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने जात पडताळणी समितीच्या आदेशाला स्थगिती दिली. त्यामुळे अश्विनी रामाणे व अन्य सहा नगरसेवक त्यांच्या पदांवर रुजू होऊ शकले. शुक्रवारच्या सुनावणीत सरकारी वकिलांनी त्यावर आक्षेप घेतला. ‘उच्च न्यायालयाने जात पडताळणी समितीच्या आदेशाला स्थगिती दिली असली तरी त्याचा अर्थ महापौर आणि नगरसेवक त्यांच्या पदावर पुन्हा रुजू होऊ शकतील, असा नाही. सर्वोच्च न्यायालयाने तशा आशयाचा एक निकाल दिला आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाने आदेशाला स्थगिती दिली तरी हे नगरसेवक पदावर रुजू होऊ शकत नाहीत,’ असा त्यांनी केला. मात्र, खंडपीठाने सरकारी वकिलांचा हा युक्तिवाद ग्राह्य धरण्यास नकार देत या याचिकांवरील सुनावणी दोन आठवड्यांनी ठेवली. (प्रतिनिधी)