शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
2
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
3
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
4
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
5
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
6
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
7
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
8
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
9
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
10
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
11
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
12
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
13
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
14
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
15
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
16
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
17
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
18
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
19
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
20
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
Daily Top 2Weekly Top 5

महिलांच्या अश्रूंचा बांध फुटला

By admin | Updated: February 22, 2015 01:05 IST

मुली, सून, नातवंडे नि:शब्द... दसरा चौकात कष्टकरी महिलांना आठवणींचा गहिवर

 कोल्हापूर : माझ्या बाबांनी कुणाचे काय वाईट केले होते?..अशी दु:खद प्रतिक्रिया देणारी कन्या मेघा पानसरे-टिक्के, स्मिता सातपुते, सून मेघा पानसरे, नातवंडे कबीर आणि मल्हार यांच्या अश्रूंचा बांध फुटत होता...हजारो लोक धीर देत होते, सांत्वन करत होते पण पानसरे कुटुंबीय नि:शब्द होते... ज्या कष्टकरी महिलांच्या कामाला पुरेसा मोबदला मिळावा म्हणून अण्णा लढले त्यांनी ‘आमचा बाप गेला,’ असा टाहो फोडला. दसरा चौकातील मैदानावर अण्णांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी कष्टकरी महिलांची प्रचंड गर्दी होती. दुपारी पार्थिव दसरा चौकात आणले. व्यासपीठावर कार्यकर्त्यांनी शवपेटी उघडताच अण्णांच्या मुली, सून आणि नातवंडांनी हंबरडा फोडला. कबीर तर तेथून उठायलाही तयार नव्हता. व्यासपीठाच्या डाव्या बाजूला स्मिता आणि मेघा पानसरे बसल्या होत्या. येणारे आप्तेष्ट आणि नातेवाईक सांत्वन करत होते. या दोघी मात्र नि:शब्द... कबीर आणि मल्हार दोघेही रडत उभे आणि जवळचे कार्यकर्ते त्यांना सावरायचा प्रयत्न करत होते. अण्णांनी ज्या कष्टकऱ्यांच्या घामाला योग्य दाम मिळावा म्हणून आयुष्यभर लढा दिला. त्या महिलांना अण्णांच्या आठवणींचा गहिवर दाटून आला. गावोगावाहून आलेल्या तंबाखूविरोधी संघटनेच्या महिला म्हणाल्या, अण्णा आम्हाला नेहमी म्हणायचे. तुम्ही लढा, कुठे अडचणी वाटल्या, साथ मिळत नाही, असे जाणवले तर माझ्याशी बोला.’ आता अण्णा गेले आम्ही कुणाशी बोलायचं.