शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

सोनवडे-घोटगे घाटाबाबत चर्चा

By admin | Updated: December 17, 2014 22:54 IST

वैभव नाईक यांची माहिती : बांधकाम मंत्र्यांनी घेतली बैठक

कुडाळ : सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्यांना जोडण्यासाठी नवीन कुडाळ तालुक्यातून सोनवडे-घोटगे घाटातून प्रलंबित असलेला रस्ता होण्याबाबत नागपूर येथे झालेल्या बैठकीत सार्वजनिक बांधकाममंत्री व संबंधित विभागाने सकारात्मक चर्चा केल्याची माहिती आमदार वैभव नाईक यांनी प्रसिध्दीपत्रकातून दिली आहे. कोल्हापूर जिल्ह्याला जोडणारा व अत्यंत जवळचा आणि सुरक्षित असलेला, मात्र प्रलंबित असलेला कुडाळ-सोनवडे-घोटगे हा घाटरस्ता लवकरात लवकर पूर्ण होण्याकरिता या मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांनी विशेष प्रयत्न सुरू केले असून यासंदर्भात त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे लक्ष वेधले होते. या रस्त्यासंदर्भात नागपूर येथे सार्वजनिक बांधकाममंत्री पाटील तसेच संबंधित विभागाचे अधिकारी यांची बैठक पार पडली. या बैठकीला आमदार वैभव नाईक, अप्पर प्रधान वनरक्षक नागपूरचे प्रकाश आविरकर, नागपूर अप्पर प्रधान वनरक्षक अजित उपळे, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम कुडाळ तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग कोल्हापूरचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत हा घाटरस्ता झाल्यास या दोन्ही जिल्ह्यातील अंतर कसे कमी होईल, वाहतुकीस कसा कमी धोकादायक होईल, यामुळे जिल्ह्याच्या विकासात कशी भर पडेल यादृष्टीने सकारात्मक चर्चा करण्यात आली. हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण होण्याकरिता प्रयत्न करणार असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगून येत्या दहा दिवसात यासंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन केल्याचेही सांगितल्याची माहिती आमदार वैभव नाईक यांनी पत्रकातून दिली आहे. (प्रतिनिधी)