शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

नव्या वर्षात विमानसेवेचा ‘टेक आॅफ’

By admin | Updated: August 19, 2016 00:58 IST

चंद्रकांतदादा यांची माहिती : उड्डाण परवाना, नाईट लँडिंगसाठी पाठपुरावा करणार

कोल्हापूर : विमान उड्डाण परवान्याचे नूतनीकरण, नाईट लँडिंगचा परवाना मिळविण्यासाठी येत्या आठ दिवसांत केंद्रीय नागरी विमान उड्डाणमंत्र्यांच्याकडे बैठक घेऊन पाठपुरावा केला जाईल. याबाबतची सर्व कार्यवाही येत्या तीन महिन्यांत पूर्ण करून दि. १ जानेवारीपासून कोल्हापूर-मुंबई अशी विमानसेवा कोल्हापूरकरांच्या सेवेत राज्य सरकारकडून रूजू केली जाईल, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी गुरुवारी दिली.कोल्हापूर विमानतळाचे विस्तारीकरण आणि विमानसेवा प्रारंभाबाबतच्या अडचणींवर चर्चा करण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी गुरुवारी मंत्रालयात संयुक्त बैठक घेतली. यावेळी खासदार राजू शेट्टी, खासदार युवराज संभाजीराजे, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव शामलाल गोयल, प्रधान सचिव राजगोपाल देवरा, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमित सैनी, करवीरचे प्रांताधिकारी प्रशांत पाटील, केंद्रीय विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीतील निर्णयाबाबत मंत्री पाटील यांनी सांगितले की, वनविभागाची जमीन संपादनाबाबतचा ‘ना हरकत ठराव’ गडमुडशिंगी ग्रामपंचायतीने दिला आहे. त्यामुळे कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी लागणारी ११ हेक्टर वनखात्याची जमीन मिळणार आहे. या जमिनीचा मोबदला महाराष्ट्र विमान विकास महामंडळ देणार आहे तसेच साडेपाच हेक्टर खासगी मालकीची जमीन ताब्यात घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत. संबंधित जमीन मालकांना रेडिरेकनर दराच्या पाचपट अधिक मोबदला देण्यात येणार आहे. त्यामुळे विमानतळ विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. सन २०१४ मध्ये कोल्हापूरचा नागरी वाहतुकीचा(पान ८ वर) दिल्लीत बैठक घेण्यास प्रयत्नशीलकोल्हापुरातील विमानसेवा प्रारंभाबाबत बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असल्याचे खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले. ते म्हणाले, विमान उड्डाण परवान्याचे नूतनीकरण, नाईट लँडिंगच्या परवान्यासह अन्य अडचणी सोडविण्याबाबत केंद्रीय नागरी विमान उड्डाणमंत्री अशोक गजपती राजू यांना बैठक घेण्याची विनंती करणार आहे. त्यासाठी सोमवारनंतर दिल्लीला जाऊन त्यांची भेट घेणार आहे. विमानसेवेचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यात येईल.