शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
2
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
3
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
4
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
5
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
6
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
7
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
8
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
9
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
10
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
11
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
12
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
13
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
14
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
15
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
16
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
17
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
18
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
19
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
20
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अन्य घटकांवरही कारवाई करा

By admin | Updated: May 6, 2015 00:37 IST

उच्च न्यायालयाचे प्रदूषणप्रश्नी आदेश : महापालिकेचा सांडपाणी प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू नाही

कोल्हापूर: पंचगंगा नदीप्रदूषणास जबाबदार असणाऱ्या अन्य औद्योगिक आस्थापनावरसुद्धा कायद्यानुसार योग्य कारवाई चालूच ठेवण्याचे आदेश मंगळवारी उच्च न्यायालयाने प्रदूषण नियंत्रण मंडळास दिले. न्या. एन. एच. पाटील व न्या. व्ही. एल. अचलिया यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. पंचगंगा प्रदूषणप्रश्नी दाखल झालेल्या याचिकेवर मंगळवारी उच्च न्यायालयात इचलकरंजी येथील लोकमित्र सहकारी यार्न प्रोसेस सहित ९ प्रोसेसिंग युनिटवर २५ टक्के पाणी कपात व त्या अनुषंगाने उत्पादन कपातीची कारवाई केली असल्याचे प्रतिज्ञापत्र महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दाखल केले. तसेच कोल्हापूर महापालिकेचा ७६ द.ल.घ.मी.चा सांडपाणी प्रकल्प पूर्ण अंशाने व क्षमतेने चालू नसल्याचेही प्रतिपादन केले आहे. इचलकरंजी येथील दत्ता माने व सदा मलाबादे यांनी वकील धैर्यशील सुतार यांच्यामार्फत दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी झाली. त्यावेळी राज्य शासनाच्यावतीने प्रदूषण नियंत्रण मंडळावर अध्यक्षासहित इतर सदस्य नियुक्तीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर तत्काळ अधिसूचना जारी केली जाईल, असे प्रतिज्ञापत्र दाखल केले. त्यावर न्यायालयाने ही प्रक्रिया पूर्ण करून लवकरात लवकर अधिसूचना जारी करण्याचे आदेश राज्य शासनास दिले. याचिकाकर्त्यांचे वकील धैर्यशील सुतार यांनी महापालिकेचा ७६ द.ल.घ.मी.चा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प पूर्ण झाला नसून प्रतिज्ञापत्रातील मजकूर चुकीचा असल्याचे सांगितले. इतर साखर कारखाने व इतर औद्योगिक आस्थापनावर सुनावणी होऊन कारवाई प्रस्तावित झाली असताना सुद्धा कारवाई केली नसल्याचा मुद्दा मांडला. त्यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाने २९ एप्रिलला संयुक्त पाहणी दरम्यान त्रुटी आढळल्याचे मान्य केले व अद्याप बरेच काम बाकी आहे, पूर्ण क्षमतेने चालू नसल्याचेही प्रतिपादन केले. न्यायालयाने इतर औद्योगिक आस्थापनावर कायद्यानुसार कारवाई सुरूच ठेवण्याचा आदेश मंडळास दिला. इचलकरंजी येथील १२ द.ल.लि.चा सीईटीपी ९ युनिट बंद व अधिक युनिटवर पाणीकपात झाल्यामुळे साडेपाच द.ल.लि.पर्यंतच चालू असल्याचे निदशर्नास आले. प्रोसेसधारकांना दिलासा नाहीचइचलकरंजी येथील बंद असलेल्या प्रोसेसधारकांना कोणताही दिलासा मिळाला नाही. त्यामुळे त्यांच्यावर अनिश्चित काळापर्यंत बंद करण्याची नामुष्की ओढवली आहे. सध्या न्यायालयाने सुनावणी १० जूनपर्यंत म्हणजे उन्हाळी सुटीनंतर तहकूब केली. त्यामुळे त्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे.