शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

तर कारखान्याची साखर रोखणार स्वाभिमानी

By admin | Updated: May 22, 2014 01:09 IST

शेतकरी संघटनेचा इशारा : पहिली उचल २६५० रुपयेसाठी १० जूनची डेडलाईन

 कुरुंदवाड : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सन २०१३-१४ सालच्या ऊस गळीत हंगामात आंदोलनावेळी कारखान्यांकडून उसाला पहिली उचल २६५० रुपये दोन टप्प्यांमध्ये देण्याचे ठरवून आंदोलन मागे घेतले होते. कारखान्यांचा गळीत हंगाम संपून महिना होत आला तरी पहिल्या उचलीतील उर्वरित रक्कम कोणत्याही कारखान्याने दिलेली नाही. जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांनी उर्वरित रक्कम १० जूनपर्यंत द्यावी, अन्यथा त्यानंतर खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असून, कारखान्यांच्या गोडावूनमधून साखरेचे एक पोतेही बाहेर पडू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य आण्णासो चौगुले व तालुकाध्यक्ष आदिनाथ हेमगिरे यांनी पत्रकार बैठकीत दिला. ते म्हणाले, शेतकर्‍यांच्या शेतीमालाला योग्य न्याय मिळवून देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्थापना झाली आहे. लोकसभा निवडणुकीत खा. शेट्टी यांच्या पाठीशी सर्व शेतकर्‍यांनी एकत्रित येऊन शेतकर्‍यांची ताकद दाखविली आहे. मात्र, राजकारण हे फक्त निवडणुकीपुरते असे सांगून ते म्हणाले, यंदा जिल्ह्यातील २० साखर कारखान्यांनी १ कोटी ७६ लाख टन उसाचे गाळप केले आहे. गाळपापूर्वी उसाला १७०० रुपयांपेक्षा जादा दर देता येणार नाही, असे म्हणणार्‍या साखर कारखानदारांनी ‘स्वाभिमानी’च्या दीड महिन्यांच्या आंदोलनानंतर दोन टप्प्यांमध्ये पहिली उचल २६५० देण्याचा निर्णय घेऊन गाळपाला सुरुवात केली. त्यानुसार पहिल्या उचलीतील २२५० रुपये, तर काही साखर कारखान्यांनी कमी-जास्त दर दिला. कारखान्याचा गळीत हंगाम संपून महिना होत आला तरी पहिल्या उचलीतील उर्वरित रक्कम अद्याप कोणत्याही कारखान्याने दिलेली नाही. त्यासाठी कारखाना व्यवस्थापकांना १० जूनची डेडलाईन देण्यात येत असून, आंदोलना दरम्यान ठरल्याप्रमाणे जे साखर कारखाने पहिली उचल देत नाहीत, त्यांच्याविरोधात खा. शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे. त्यासाठी पहिल्या टप्पा म्हणून साखर कारखान्यांच्या गोडावूनमधून साखरेचे एकही पोते बाहेर सोडणार नाही. आंदोलन तीव्र करण्यासाठी प्रत्येक तालुकानिहाय कार्यकारिणीची बैठक घेण्यात येणार आहे. यावेळी जि. प.चे बांधकाम सभापती सावकर मादनाईक, पै. विठ्ठल मोरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष उल्हास पाटील, युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष बंडू पाटील, के. आर. चव्हाण, मिलिंद साखरपे, रामचंद्र फुलारे, मनोहर पुजारी, सागर शंभूशेट्टी, सागर चिप्परगे, आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)