शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
2
ममतांचा किल्ला कसा भेदला? काय होता विजयाचा फॉर्म्युला? भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्या प्लॅनची ‘इनसाइड स्टोरी’
3
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
4
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
5
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या ७ भारतीय खलाशांची केली मदत
6
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
7
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
8
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
9
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
10
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
11
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
12
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
13
हे भोंदू बुवा आणि बाबा इतके का आणि कसे बोकाळले?
14
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
15
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
16
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
17
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
18
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
19
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
20
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
Daily Top 2Weekly Top 5

कारखान्यांना बजावलेल्या आयकर नोटिसांना स्थगिती

By admin | Updated: May 7, 2015 00:19 IST

अरुण जेटलींचे आदेश : राजू शेट्टींची माहिती

जयसिंगपूर : साखर कारखान्यांना आयकर खात्याने बजावलेल्या नोटिसींना तत्काळ स्थगिती देण्याचा आदेश केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बुधवारी अर्थमंत्रालयात दिला. उचित आणि लाभकारी मूल्यापेक्षा (एफआरपी) जास्त उसाचा दर देणाऱ्या साखर कारखान्यांना आयकर विभागाने आयकराबाबत नोटिसा पाठविलेल्या होत्या. महाराष्ट्र प्रदेश भाजपचे अध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने अर्थमंत्री अरुण जेटली यांची संसदेत भेट घेऊन विनंती केली होती, त्यावेळी हे आदेश देण्यात आले असल्याची माहिती खा. राजू शेट्टी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.पत्रकात म्हटले आहे की, केंद्र सरकार उसाला उचित आणि लाभकारी मूल्य (एमआरपी) संपूर्ण देशाला जाहीर करीत असते; परंतु राज्यनिहाय भौगोलिक परिस्थिती वेगळी असते. साखर नियंत्रणमुक्त करणाऱ्या सी. रंगराजन समितीच्या शिफारशींनुसार प्रत्येक राज्याने एफआरपीपेक्षा जादा भाव किती निघतो, हे पाहण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचे सुचविले होते. शिष्टमंडळाने अर्थमंत्र्यांना विनंती केली की, केंद्र व राज्य सरकारच्या समितीने सुचविलेल्या दराएवढी उसाची किंमत देणाऱ्या साखर कारखान्यांना देण्याचे आदेश काढले. येत्या पावसाळी अधिवेशनापर्यंत थांबण्यास सांगितले. कारण जुलै महिन्यात पुरवणी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून यासंबंधी सभागृहात मांडून निर्णय घेण्यात येईल. गेल्या अनेक वर्षांपासून एफआरपीपेक्षा जादा रक्कम देणाऱ्या साखर कारखान्यांना आयकर विभागाच्या नोटिसा हा चिंतेचा विषय झालेला होता. यामुळे हा विषय निकाली निघण्याचे मार्ग खुले झाले आहेत. या शिष्टमंडळात साखर संघाचे अध्यक्ष विजयसिंह मोहिते-पाटील, खा. संजय पाटील, खा. राजू शेट्टी व खा. सुप्रिया सुळे यांचा समावेश होता. (प्रतिनिधी)कारखान्यांच्या चिंतेचा विषय मार्गीएफआरपीपेक्षा जादा रक्कम देणाऱ्या साखर कारखान्यांना नोटिसा हा चिंतेचा विषय होता. यासाठी केंद्रीय अर्थमंत्र्यांना विनंती केली होती. त्यामुळे हा विषय निकाली निघण्याचे मार्ग खुले झाले आहेत.