शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

जाळपोळीनंतर ‘एव्हीएच’ला स्थगिती

By admin | Updated: March 8, 2015 00:47 IST

अधिकाऱ्यांना कोंडले : वाहनांची जाळपोळ, पोलिसांवर दगडफेक, पोलिसांकडून अश्रुधुराचा वापर

 चंदगड : हलकर्णी (ता. चंदगड) औद्योगिक वसाहतीतील वादग्रस्त ‘एव्हीएच’ केमिकल्स प्रकल्प शनिवारी संतप्त जमावाने पेटवून दिला. प्रकल्प पेटल्याने आकाशात धुराचे लोट जाताना दिसत होते. एव्हीएच प्रकल्पामधील कर्मचाऱ्यांची गाडी पाटणे फाटा येथे पेटवली. त्याचबरोबर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी सूर्यकांत डोके व उपविभागीय अधिकारी मनीष होळकर यांना सुमारे सहा तास कोंडून घातले. या अधिकाऱ्यांच्या दोन आलिशान गाड्या जाळल्या, तर प्रांताधिकारी कुणाल खेमनार, पोलीस अधीक्षक मनोजकुमार शर्मा व पोलिसांच्या अन्य गाड्यांवर जोरदार दगडफेक केली. या गाड्याही संतप्त नागरिकांनी पेटवून देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, जनतेच्या उद्रेकाची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मिळाल्यानंतर त्यांनी प्रकल्पाला स्थगिती देत असल्याची घोषणा केली. प्रदूषणकारी एव्हीएच केमिकल प्रकल्प चंदगड तालुक्यातून हद्दपार करावा यासाठी गेल्या दोन वर्षांपासून नागरिकांनी आंदोलनाच्या माध्यमातून प्रयत्न चालवले होते. प्रकल्पाला २८ जानेवारी २०१५ रोजी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी एव्हीएचला उत्पादन घेण्यास परवानगी दिली होती. त्यानंतर गेले महिनाभर त्याविरोधात लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू होते. दरम्यान, यासंदर्भात आंदोलकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पर्यावरणमंत्री रामदास कदम यांची एकत्र बैठक घेऊन प्रकल्पाच्या दुष्परिणामांची माहिती देऊन प्रकल्पाला स्थगितीची मागणीही केली होती. त्यावर पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी ११ फेब्रुवारी रोजी प्रकल्पाला स्थगितीचे आदेश देण्याबाबत त्यांच्या प्रधान सचिवांना आदेश बजावले; परंतु सचिवांनी ते आदेश एव्हीएच कंपनीला लागू केले नसल्याने लोकांमध्ये संतप्त भावना होती.