शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

संशयित स्प्लेंडर कळंब्यातील

By admin | Updated: February 25, 2015 00:50 IST

महिन्यापूर्वी चोरी : गाडी एस.टी.च्या वाहकाची; पानसरे हत्या प्रकरणाशी धागेदोरे मिळण्याची शक्यता

कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास सुरू असताना कागल येथे दूधगंगा नदीच्या जुन्या पुलाजवळील पात्रामध्ये कागल पोलिसांना संशयितरीत्या सापडलेली हीरो होंडा स्प्लेंडर ही कळंबा (ता. करवीर) येथील एका एस. टी. वाहकाची असल्याचे मंगळवारी तपासात स्पष्ट झाले. दुचाकीच्या चेसनंबरवरून मालकाचा शोध लागला. त्यांनी एक महिन्यापूर्वी जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गाडी चोरीस गेल्याचे सांगितले. दरम्यान, पानसरे यांच्या मारेकऱ्यांनीही स्प्लेंडर मोटारसायकल वापरल्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाल्याने ‘त्या’ दुचाकीचे या घटनेशी साम्य मिळते-जुळते आहे का, याचा पोलीस शोध कसून शोध घेत आहेत. मोटारसायकल चोरीच्या संशयावरून राजारामपुरी पोलिसांनी आरसी गँगच्या १५ सदस्यांकडे कसून चौकशी सुरू केली आहे. या घटनेतून काही धागेदोरे मिळण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. पानसरे हत्येचा तपास सुरू असताना पोलिसांना कागल येथे दूधगंगा नदीमध्ये संशयास्पद स्प्लेंडर मोटारसायकल मिळाल्याने पोलिसांची तपासाची चक्रे गतीमान झाली. दुचाकी चोरीची आहे की कोणत्या गुन्ह्णातील आहे याचा शोध घेण्यासाठी चेस क्रमांकाच्या आधारे मालकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला असता तो कळंब्यातील रहिवाशी असल्याचे स्पष्ट झाले. ते संभाजीनगर येथील एस. टी. डेपोमध्ये वाहक पदावर कार्यरत असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यांनी कागल पोलीस ठाण्यात येऊन मोटारसायकल पाहिली असता ती आपलीच असून एक महिन्यांपूर्वी जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेल्याचे सांगितले. चोरट्याने गाडीचे पाठीमागील चाक व पुढचे फुटलेले टवळे नवीन घातल्याचे दिसते, तसा जबाबही त्यांचा घेण्यात आला. दरम्यान, अप्पर पोलीस अधीक्षक अंकित गोयल व करवीचे उपविभागीय पोलीस उपअधीक्षक अमर जाधव, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे अनिल देशमुख यांनी घटनास्थळी भेट देऊन नदीपात्रामध्ये आणखी कोणती वस्तू मिळते का याचा पानबुड्यांच्या साहाय्याने शोध घेतला परंतु मोटारसायकलचे सुटे पार्ट सोडून काहीही हाती लागले नाही.(प्रतिनिधी)आयजींनी घेतली बैठक पानसरे हत्या प्रकरणासंदर्भात तपासाचा आढावा घेण्यासाठी पोलीस महानिरीक्षक रितेशकुमार शर्मा यांनी मंगळवारी रात्री सर्व तपास अधिकाऱ्यांची बैठक घेतली. संशयास्पद आढळलेल्या दुचाकीवरून आरोपींचा माग काढण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले.