शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
4
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
5
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
6
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
7
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
8
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
9
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
10
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
11
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
12
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
13
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
14
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
15
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
17
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
18
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
19
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
20
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

सूर्यकिरणांनी केला अंधुकसा चरणस्पर्श

By admin | Updated: November 11, 2014 00:18 IST

अंबाबाईचा किरणोत्सव : ढगाळ वातावरण, प्रदूषण

कोल्हापूर : दुपारपासून झालेले ढगाळ वातावरण आणि प्रदूषणामुळे किरणांची तीव्रता कमी झाल्याने करवीरनिवासिनी अंबाबाईच्या किरणोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी (सोमवारी) संध्याकाळी ५ वाजून ४६ मिनिटांनी सूर्यकिरणांनी अंधुकसा चरणस्पर्श केला. मंदिरशैली आणि वास्तुशास्त्राचा उत्तम नमुना असलेल्या अंबाबाई मंदिरात कालपासून किरणोत्सवाला प्रारंभ झाला. काल, ढगाळ वातावरणामुळे किरणोत्सव होऊ शकला नव्हता. आजही दुपारी तीन वाजल्यानंतर वातावरण ढगाळ झाल्याने सूर्यकिरणेच दिसेनाशी झाली होती. त्यामुळे आजही भाविकांना आजही किरणोत्सव होणार नाही, अशी शंका होती. मात्र, संध्याकाळी ५ वाजून ३६ मिनिटांनी पितळी उंबऱ्यात आलेल्या सूर्यकिरणांनी ५ वाजून ४६ मिनिटाला अंबाबाईच्या मूर्तीला चरणस्पर्श केला. त्यानंतर किरणे ढगाआड गेली. किरणोत्सव पूर्ण क्षमतेने होऊन ती मूर्तीच्या मुखावर पडण्यासाठी सूर्यकिरणांची अधिकाधिक तीव्रता १० लक्स मीटर तर कमीत कमी तीव्रता ३ लक्स मीटर असावी लागते. आज ०.५ इतकी कमी तीव्रता असल्याने अपेक्षेप्रमाणे किरणोत्सव होऊ शकला नाही. ‘केआयटी’चे प्राध्यापक किशोर हिरासकर व खगोल अभ्यासक मिलिंद कारंजकर यांनी किरणोत्सवाचे निरीक्षण केले. किरणोत्सवादरम्यान मंदिरातील सर्व लाईट बंद केलेले असतात. मात्र, गाभाऱ्यातील काही छायाचित्रकार आणि भाविक मोबाईलद्वारे छायाचित्र घेताना कॅमेरातून पडणाऱ्या फ्लॅशमुळे किरणोत्सवात प्रचंड अडथळा येतो. यावर एका भाविकाने संतप्त प्रतिक्रिया दिली नंतर त्यांनी देवस्थान समितीच्या कार्यालयात आपली तक्रार दाखल केली. (प्रतिनिधी)