शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

तुटपुंज्या पगारासाठी जीवरक्षकांचा जीव टांगणीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 14:56 IST

आपत्कालीन परिस्थितीत स्वत:च्या जिवाची पर्वा न करता दुसऱ्याचा जीव वाचविणारेच असुरक्षित आहेत. महापालिकेतील अग्निशमन दलातील ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांची ही स्थिती आहे. तुटपुंज्या पगारासाठी त्यांना जीव धोक्यात घालून काम करावे लागत आहे. रिक्त जागांवर कायम करण्याची मागणी त्यांच्याकडून जोर धरत आहे.

ठळक मुद्देअग्निशमन दलातील ठोक मानधन कर्मचाऱ्याची स्थिती जीव धोक्यात : कायम करण्याची मागणी

विनोद सावंतकोल्हापूर : आपत्कालीन परिस्थितीत स्वत:च्या जिवाची पर्वा न करता दुसऱ्याचा जीव वाचविणारेच असुरक्षित आहेत. महापालिकेतील अग्निशमन दलातील ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांची ही स्थिती आहे. तुटपुंज्या पगारासाठी त्यांना जीव धोक्यात घालून काम करावे लागत आहे. रिक्त जागांवर कायम करण्याची मागणी त्यांच्याकडून जोर धरत आहे.महापालिकेमध्ये सर्वांत प्रभावीपणे काम करणारा विभाग म्हणून अग्निशमन दलाची ओळख आहे. मात्र, या विभागात कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली गेलेली नाही. यामुळे अनेक जागा रिक्त आहेत. कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडत आहे. केवळ ३० कर्मचारी कायम असून, ठोक मानधन, रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांवर अग्निशमन दलाचा डोलारा आहे.पगार कमी, जोखमीचे काम११८ पैकी ५८ कर्मचारी ठोक मानधनावरील आहेत. भविष्यात कायम होईल, या आशेने ते जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. गेल्या आठ वर्षांपासून रोजंदारीवर काम करणारे कर्मचारी आहेत. त्यांनी महापूर आल्यानंतर १७ जणांचा जीव वाचविला. चांगले काम केल्याबद्दल ठोक मानधनावरील कर्मचाºयांना वेतनवाढ करण्याचा निर्णय झाला. मात्र, अंमलबजावणी झालेली नाही. पगार कमी आणि जोखमीचे काम अशी त्यांची स्थिती आहे. पद                          मंजूर पदे      रिक्त पदे

  • स्थानक अधिकारी        ३               २
  • वाहनचालक                 ३२            २५
  • टेक्निकल इन्स्ट्रक्टर   १               १
  • तांडेल                          २१             ५
  • फायरमन                  १०८            ७९
  • अटेंडंट                         १४            ११

ठोक मानधनावरील कर्मचारी

  • फायरमन - ४०
  • वर्कशॉपकडील ठोक मानधन - ६
  • केएमटीकडील ठोक मानधनावरील वाहनचालक - १२

 

रिक्त जागांवर कायम करण्यासाठी साकडेअग्निशमन दलाकडे १२२ रिक्त जागा असून या जागेवर ठोक मानधनावरील काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना कायम करा, अशी मागणी जोर धरत आहे. रोजंदारी कर्मचाऱ्यांनी खासदार धैर्यशील माने, आमदार ऋतुराज पाटील, महापौर निलोफर आजरेकर यांच्याकडे कायम करण्यासाठी साकडे घातले.

किमान वेतनही नाहीअग्निशमन दलातील ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांना किमान वेतनही मिळत नाही. केवळ १० हजार रुपये पगार असून कपात होऊन आठ हजार रुपयेच त्यांच्या हातात मिळतात. यामध्ये घरखर्च चालविणार कसा, असा सवाल त्यांच्याकडून उपस्थित होत आहे. कमी कर्मचारी असल्यामुळे काही कर्मचाऱ्यांना डबल ड्यूटीही करावी लागते. कायम करण्याची मागणी केल्यास आस्थापनावर ३५ टक्क्यांपेक्षा जास्त खर्च करता येत नसल्याचे कारण पुढे केले जात आहे.

टॅग्स :fire brigade puneपुणे अग्निशामक दलkolhapurकोल्हापूर