शिरोळातील २७ गावांमधील क्षारपड जमिनीचा सर्व्हे होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:02 IST2021-02-05T07:02:25+5:302021-02-05T07:02:25+5:30

कुरुंदवाड : महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर शिरोळ तालुक्यासह पश्चिम महाराष्ट्रातील क्षारपड जमीन सुधार योजना राबवण्यासाठी राज्य शासनाने सकारात्मक ...

A survey of saline land will be conducted in 27 villages of Shirola | शिरोळातील २७ गावांमधील क्षारपड जमिनीचा सर्व्हे होणार

शिरोळातील २७ गावांमधील क्षारपड जमिनीचा सर्व्हे होणार

कुरुंदवाड : महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर शिरोळ तालुक्यासह पश्चिम महाराष्ट्रातील क्षारपड जमीन सुधार योजना राबवण्यासाठी राज्य शासनाने सकारात्मक निर्णय घेतला असून क्षारपड जमीन सुधार योजनांसाठी शासन शेतकऱ्यांना मदत करणार असल्याबाबतचा निर्णय जलसंपदामंत्री जयंत पाटील आणि मंत्रिमंडळाने घेतला आहे.

याचाच भाग म्हणून क्षारपड झालेल्या सर्व जमिनींचा सर्व्हे करण्याचे काम शासनाच्या पाटबंधारे विभागाकडून लवकरच सुरू केले जाणार आहे. शिरोळ तालुक्यामधील २७ गावांमधील क्षारपड जमिनीच्या सर्व्हेचे काम लवकरच सुरू केले जाईल. या सर्व्हेसाठी रुपये ५२ लाखाच्या निधीची मागणी केली असून हा निधी लवकरच मंजूर करून घेतला जाईल, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी शिरढोण येथे बोलताना दिली.

राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या स्थानिक विकास निधीमधून आणि शासनाच्या २५्-१५ योजनेमधून मंजूर जवळपास १ कोटी २७ लाख रुपये खर्चाच्या विकास कामांचे उद्‌घाटन शुक्रवारी शिरोळ तालुक्यामधील बस्तवाड, अकिवाट व शिरढोण या गावांमध्ये करण्यात आले, विकास कामांच्या शुभारंभप्रसंगी नामदार यड्रावकर बोलत होते.

बस्तवाड येथे दादेपाशा पटेल, बापूसाहेब पटेल, राजू चिंचवाडे, जे. डी. चव्हाण, सुभाष चौगुले, अनिल उमराणी, रफिक पटेल, जमीर पटेल, कल्लाप्पा कांबळे, रफिक चमन मलिक, विजय कांबळे, नुरुद्दीन जमादार, आप्पासाहेब नाईक, इरशाद पटेल, अकिवाट येथे जिल्हा परिषद सदस्य दलितमित्र अशोकराव माने, इकबाल बैरागदार, सरपंच विशाल चौगुले, आप्पासाहेब बडबडे, अजित फरांडे, तहसीलदार गुरुजी, अरुण कल्लनावर, रावसाहेब नाईक, विशाल आवटी, बाबासाहेब उमाजे, जवाहर साखरचे संचालक संजयकुमार कोथळी, आप्पासाहेब दानोळे, पांडुसिंग रजपूत, जयपाल चौगुले, गणपती कागे. शिरढोण येथे अविनाश खंजिरे, दस्तगीर बाणदार, कल्लाप्पा चौगुले, अविनाश पाटील, विकास कांबळे, चंद्रकांत मोरे, पंचायत समिती सदस्या अर्चना चौगुले, बाबूराव कोईक, कल्लाप्पा कोईक, रावसाहेब यमकनमर्डी, सूर्यकांत कोळी, दिलीप पाटील, विश्वास बालीघाटे, विद्यासागर पाटील, किरण कोईक यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: A survey of saline land will be conducted in 27 villages of Shirola