शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
2
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
3
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
4
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
5
ना बाजारात विकत, ना जेवणात वापरत, भारतीत एकमेव शहर, येथे  कांदा, लसुणीच्या वापरावर आहे पूर्ण बंदी
6
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
7
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
8
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
9
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
10
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
11
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
12
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
13
जगाची ‘लाईफलाईन’ धोक्यात? मलक्काच्या मार्गावर अमेरिकेचा पहारा, चीनची वाढली धडधड!
14
रिक्षा चालवून लेकाला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न; वडिलांवर आली अंत्यसंस्कारासाठी पैसे मागण्याची वेळ
15
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
16
Lori Deremer: देशावर युद्धाचं संकट, पण ट्रम्प सरकारची महिला मंत्री करत होती 'पूल पार्टी'
17
इराणची लेडी डॉन शमीम माफीला अमेरिकेत अटक, विमानतळावरच ठोकल्या बेड्या; प्रकरण काय?
18
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
19
क्रिकेट इतिहासात शून्यावर बाद होणारा पहिला खेळाडू कोण? १४९ वर्षांपूर्वी नोंदवला गेला हा लाजीरवाणा विक्रम; कसा आला 'डक' शब्द? जाणून घ्या
20
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

मिरज-पुणे रेल्वेमार्गाचे दुहेरीकरणासाठी सर्वेक्षण

By admin | Updated: June 1, 2015 00:12 IST

चाचपणी : तांत्रिक अधिकाऱ्यांचे पथक कार्यरत

मिरज : मिरज-पुणे या २८० किलोमीटर रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरण व विद्युतीकरणासाठी सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. मध्य रेल्वेचे पुणे विभागीय व्यवस्थापक सुनील वर्मा, उपव्यवस्थापक एस. के. तिवारी यांच्यासह तांत्रिक अधिकाऱ्यांनी रेल्वेमार्गाची पाहणी केली. पुणे-मिरज-लोंढा या मार्गाच्या दुहेरीकरण, विद्युतीकरणाची रेल्वे अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आली आहे. यासाठी तीन हजार कोटी रूपये खर्च अपेक्षित असून, मिरज-पुणे मार्गासाठी यावर्षी ३९९ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. आता या मार्गाच्या सर्वेक्षणाचे काम सुरू झाले आहे. रेल्वेच्या बांधकाम, लोहमार्ग, जोडणी, विद्युत विभागासह विविध तांत्रिक विभागांकडून सर्वेक्षण होणार असून, यासाठी आणखी कालावधी लागणार आहे. मिरज-पुणे रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाची व विद्युतीकरणाची मागणी अनेक वर्षांपासूनची आहे. दुहेरीकरण व विद्युतीकरणामुळे मिरज-पुणे मार्गावरील प्रवास जलद होणार आहे. रेल्वेगाड्यांचा वेग व रेल्वेगाड्यांची संख्या वाढणार आहे. रेल्वे अधिकाऱ्यांच्या पथकाने २८० किलोमीटर रेल्वेमार्गासह साताऱ्याजवळ सालपा ते आदर्कीदरम्यान डोंगरातून जाणाऱ्या रेल्वेमार्गाची पाहणी केली. सालपा ते आदर्कीदरम्यान डोंगरात बोगदा काढून पर्यायी रेल्वेमार्गाची चाचणी करण्यात येत आहे. या मार्गावर रेल्वेगाड्यांची संख्या व वाहतूक कमी असल्याने, दुहेरीकरणाची आवश्यकता नसल्याचा पवित्रा रेल्वे प्रशासनाने घेतला होता. मात्र आता रेल्वे अर्थसंकल्पात घोषणा व निधीची तरतूद झाल्याने मार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरणाच्या सर्वेक्षणास सुरूवात झाली आहे. (वार्ताहर)