शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
6
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
7
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
8
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
9
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
10
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
11
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
12
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
13
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
14
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
15
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
16
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
17
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
18
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
19
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
20
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

‘पुरातत्त्व’कडून पाहणी

By admin | Updated: August 26, 2015 00:40 IST

रखडलेल्या पुलाची लवकरच परवानगी : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी आर. के. बामणे यांनी परवानगीसाठी पाठपुरावा करीत आहोत, असे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

कोल्हापूर : शहरालगत असलेल्या शिवाजी पुलाशेजारी नव्याने बांधण्यात येत असलेल्या पर्यायी पुलाच्या रखडलेल्या कामांची पाहणी केंद्रीय पुरातत्त्व विभागाचे अधिकारी रेनडे-पाटील यांनी मंगळवारी केली. कामासाठी आवश्यक असलेली पुरातत्त्व विभागाची परवानगी लवकर मिळावी, यासाठी अहवाल दिला जाईल, असे पाटील यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना सांगितले. कोल्हापूर-रत्नागिरी रस्त्यावर १३४.८० मीटर लांबीच्या पर्यायी पुलासाठी १६ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. मार्च २०१३ रोजी पुलाच्या कामाला सुरुवात झाली. मात्र वाळूटंचाई, पाटबंधारे, पुरातत्त्व, नगररचना, महानगरपालिका यांच्या परवानग्यांसाठी काम विविध टप्प्यांत रेंगाळले. उर्वरित पुलाचे काम करण्यासाठी ब्रह्मपुरी परिसरातील झाडे तोडण्याची परवानगी राष्ट्रीय महामार्ग प्र्राधिकरणाने महानगरपालिकेकडे मागितली. महानगरपालिका प्रशासनाने पुरातत्त्व विभागाची परवानगी आवश्यक असल्याचे सांगितले. या पार्श्वभूमीवर पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी कामांची पाहणी केली. पुरातत्त्व विभागाकडून परवानगी मिळाल्यानंतर सहा महिने ठप्प असलेल्या कामाला सुरुवात होणार आहे. मार्च २०१६ अखेर काम पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे. आतापर्यंत शहराशेजारीच असलेल्या या पुलाचे ७० टक्के काम झाले आहे. उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी सर्व परवानग्यांची आवश्यकता आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी आर. के. बामणे यांनी परवानगीसाठी पाठपुरावा करीत आहोत, असे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.