सुरुपली येथे बाणगेच्या युवकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:53 IST2021-02-05T06:53:24+5:302021-02-05T06:53:24+5:30
सुरुपली (ता. कागल)जवळच्या घोडेश्वर मंदिराच्या पाठीमागील बाजूस झाडाला गळफास लावून युवकाने आत्महत्या केली. करण दाजी गोसावी (वय १९, रा. ...

सुरुपली येथे बाणगेच्या युवकाची आत्महत्या
सुरुपली (ता. कागल)जवळच्या घोडेश्वर मंदिराच्या पाठीमागील बाजूस झाडाला गळफास लावून युवकाने आत्महत्या केली. करण दाजी गोसावी (वय १९, रा. बानगे, ता. कागल ) असे मृताचे नाव आहे. घटनेची नोंद मुरगूड पोलिसांत झाली आहे. बानगे येथील स्क्रॅप व्यवसाय करणारा करण दाजी गोसावी याने सुरुपलीच्या हद्दीतील काळे खडक नावाच्या परिसरातील झाडाला गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबतची फिर्याद युवकाचा भाऊ अर्गन दाजी गोसावी यांनी मुरगूड पोलिसांत दिली आहे. अधिक तपास पोलीस दीपक मोरे करत आहेत.