म्हालसवडे परिसरातील सात एकरातील उसाला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:52 IST2021-02-05T06:52:13+5:302021-02-05T06:52:13+5:30

ऊस तोडणी झालेल्या उसाचे खोडवे पेटवताना शेजारील उसाच्या फडाला आग लागल्याने म्हालसवडे येथील काशिनाथ पाटील, सोनाळी येथील हिंदुराव पाटील, ...

Sugarcane fire on seven acres in Mhalaswade area | म्हालसवडे परिसरातील सात एकरातील उसाला आग

म्हालसवडे परिसरातील सात एकरातील उसाला आग

ऊस तोडणी झालेल्या उसाचे खोडवे पेटवताना शेजारील उसाच्या फडाला आग लागल्याने म्हालसवडे येथील काशिनाथ पाटील, सोनाळी येथील हिंदुराव पाटील, केरबा पाटील, कृष्णात पाटील, सुरेश पाटील, विलास पाटील, बाळू पाटील या शेतकर्‍यांचा चार एकर क्षेत्रातील ऊस जळाला.

याचदरम्यान कांचनवाडी येथील बाळासाहेब पाटील, तानाजी पाटील, शंकर पाटील व सागर पाटील या शेतकर्‍यांचा अडीच एकर क्षेत्रातील ऊस आगीत जळाला . भोगावती साखर कारखान्याच्या हसूर दुमाला गट कार्यालयातील शेती अधिकारी अतुल चौगले, विजय पाटगावकर, ऋतुराज ठाकरे व संदीप पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन जळालेल्या उसाची ताबडतोब तोडणी करण्याच्या सूचना ऊसतोड मजुरांना केल्या आहेत. तसेच शेतकऱ्यांनी जळीत होऊ नये याकरिता विशेष खबरदारी घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. अचानक लागलेल्या आगीत या शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

Web Title: Sugarcane fire on seven acres in Mhalaswade area