याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी, बिद्री ते मुधाळ तिट्टा दरम्यान असलेल्या ब्राम्हणकी नावाच्या शिवारात शुक्रवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली. काही शेतकऱ्यांनी धाडसाने आग विझविण्याचा प्रयत्न केला; परंतु आगीच्या ज्वालांपुढे त्यांचे काहीच चालत नव्हते.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}शेतकऱ्यांनी बिद्री साखर कारखान्याशी संपर्क साधल्यावर अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाले. सुमारे तासाभराच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. या घटनेत राजेंद्र पांडुरंग कुलकर्णी व शिवाजी कृष्णा वारके यांच्या सुमारे चार एकर उसाचे मोठे नुकसान झाले.
फोटो ओळी
बोरवडे (ता. कागल) येथे शॉर्टसर्किटमुळे उसाला लागलेली आग विझविताना शेतकरी.