शहरं
Join us  
Trending Stories
1
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
2
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
3
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
4
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
5
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
7
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
8
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
9
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
11
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
12
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
13
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
14
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
15
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
16
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
17
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
18
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
19
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
20
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
Daily Top 2Weekly Top 5

यशासाठी वेळेचे व्यवस्थापन आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:22 IST

गडहिंग्लज : वेळ ही सर्वांत मौल्यवान गोष्ट आहे. एकदा गेलेली वेळ व संधी पुन्हा परत येत नाही. त्यामुळे जीवनाचे ...

गडहिंग्लज : वेळ ही सर्वांत मौल्यवान गोष्ट आहे. एकदा गेलेली वेळ व संधी पुन्हा परत येत नाही. त्यामुळे जीवनाचे ध्येय आणि रस्ता निश्चित करा. सकारात्मक विचार व कौशल्य आणि वेळेचे योग्य व्यवस्थापन करा, कोणत्याही क्षेत्रांत नक्कीच यश मिळेल, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक प्रा. डॉ. ए. एम. गुरव यांनी केले.

येथील ज्ञानदीप प्रबोधिनी संचलित झेप अ‍ॅकॅडमीतर्फे आयोजित ‘वेळेचे व्यवस्थापन’ या विषयावरील ऑनलाईन कार्यशाळेत ते बोलत होते. संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले यांची प्रमुख उपस्थिती होती.

गुरव म्हणाले, जीवनातील सुख-सोयींमुळे वेळेच महत्त्व दुर्लक्षित झाले आहे. आपण नेहमी पैशाचा हिशेब ठेवतो, वेळेचा हिशेब कधीच ठेवत नाही. परंतु, वेळ ही कायमस्वरूपी गुंतवणूक असून भांडवलाप्रमाणे त्याचा योग्य उपयोग करायला हवा.

प्रत्येक क्षणाची आपण काळजी घेतली तरच प्रत्येक क्षण आपली काळजी घेईल. जीवनातील प्रत्येक टप्प्यावर आपण सिंहावलोकन करायला हवे. दैनंदिन कामातील प्राधान्यक्रम निश्चित करून त्याची पूर्तता वेळेवर करायला हवी. तरच आपला भविष्यकाळ उज्ज्वल आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

संस्थापक चौगुले यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्या मीना रिंगणे यांनी स्वागत केले. सागर माने यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. .

यावेळी कार्याध्यक्ष दत्ता पाटील, प्रा. विजय आरबोळे, कल्पना पाटील यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

------------------------

* इंजि. शिवानंद मरगुद्दी हे ऑस्ट्रेलियातून वेबिनारमध्ये सहभागी झाले होत. त्याशिवाय ‘रवळनाथ’ व ‘ज्ञानदीप’ परिवारातील मान्यवरासह झेप अ‍कॅडमीचे ९० प्रशिक्षणार्थी या वेबिनारमध्ये सहभागी झाले होते.

-------------------------

* फोटो ओळी : गडहिंग्लज येथील ऑनलाईन कार्यशाळेत प्रा. डॉ. ए. एम. गुरव यांनी मार्गदर्शन केले.

क्रमांक : ०९०५२०२१-गड-०४