लॉकडाऊन नियमांचे काटेकोर पालन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:23 IST2021-05-23T04:23:54+5:302021-05-23T04:23:54+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क वारणानगर : पन्हाळा पूर्व भागातील काही गावांमधून कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असतानाही याबाबत कोणीही गांभीर्याने घेत ...

Strictly follow the lockdown rules | लॉकडाऊन नियमांचे काटेकोर पालन करा

लॉकडाऊन नियमांचे काटेकोर पालन करा

लोकमत न्यूज नेटवर्क

वारणानगर : पन्हाळा पूर्व भागातील काही गावांमधून कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असतानाही याबाबत कोणीही गांभीर्याने घेत नसल्याने लाॅकडाऊनच्या नियमांचे काटेकोर पालन करण्यासाठी कोरोना दक्षता समितीने लोकजागृतीचे काम हाती घेण्याचे आवाहन कोडोली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिनेश काशीद यांनी केले.

कोरोना दक्षता समितीबरोबर झालेल्या आढावा बैठकीदरम्यान काशीद बोलत होते. बहिरेवाडी गावात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत चालली असून, तरुणांबरोबरच वृद्धसुद्धा कोरोनाचे बळी ठरत आहेत. यासाठी गावपातळीवर कडक लाॅकडाऊनच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याची गरज आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत दंडात्मक कारवाई करणे गरजेचे असून, दक्षता समितीच्या माध्यमातून पाॅझिटिव्ह रुग्णांचे समुपदेशन करावे लागेल. यासाठी आरोग्य विभागाचे सहकार्य घ्यावे, वाढती रुग्णसंख्या थांबविण्यासाठी विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांसाठी जनजागृती अभियान राबविण्याचे आवाहन सपोनि दिनेश काशीद यांनी केले.

यावेळी सरपंच शिरीषकुमार जाधव, कोरोना दक्षता समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.

फोटो ओळ - बहिरेवाडी (ता. पन्हाळा) येथे विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करताना सपोनि दिनेश काशीद व दक्षता समितीचे सदस्य, नागरिक.

फोटो -

Web Title: Strictly follow the lockdown rules