शिरगाव : एकाच कुटुंबातील तब्बल पाच व्यक्ती कोरोनाग्रस्त आढळल्याने दक्षतेचा उपाय म्हणून आज रविवार, दि. २३ ते बुधवार दि. २६ अखेर चार दिवस आवळी खुर्द येथे कडकडीत बंद पाळला जाणार आहे. याबाबतची माहिती कोरोना दक्षता समिती तथा सरपंच विजय पाटील व उपसरपंच सुभाष हुंंदळकर यांनी दिली. दोन दिवसांपूर्वी एकाच कुटुंबातील तब्बल पाच व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. तहसीलदार मीना निंबाळकर, मंडल अधिकारी शिवाजी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसपाटील रामचंद्र पाटील, तंटामुक्तीचे शामराव पाटील, ग्रामसेवक साताप्पा पाटील, तलाठी नीलेश पाटील यांनी ग्रामस्थांसह स्थानिक गटनेते यांची तातडीची बैठक घेऊन बंदचा निर्णय घेतला
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}