शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
3
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
4
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
6
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
7
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
8
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
9
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
10
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
11
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
12
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
13
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
14
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
15
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
16
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
17
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
18
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
19
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
20
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
Daily Top 2Weekly Top 5

टॉवरावरच्या ‘डॉन’साठी पेटला जिवघेणा संघर्ष

By admin | Updated: December 1, 2014 00:00 IST

कांदेकर-मोरस्कर आमने-सामने : वेळीच दहशत संपविण्याची गरज

एकनाथ पाटील = कोल्हापूर -एकेकाळी रंकाळा टॉवरचा ‘डॉन’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या उमेश कांदेकर याच्या निधनानंतर त्याचे लेबल आपल्या नावावर लावण्यासाठी उमेशचा भाऊ हेमंत आणि मित्र रणजित मोरस्कर यांच्यात गेल्या पाच वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. या संघर्षाला दोन्ही बाजूंनी राजकीय पाठबळ मिळाल्याने स्वत:चे वर्चस्व सिद्ध करण्यासाठी ते एकमेकांना संपविण्याचा प्रयत्न करीत आहेत. पोलिसांनी सात ते आठ वेळा दोन्ही समर्थकांत मध्यस्थी करून पेटलेले वादळ शांत करण्याचा प्रयत्न केला; परंतु काही दिवस शांत झाल्यानंतर पुन्हा ‘डॉन’साठी दोन्ही समर्थकांत संघर्ष पेटला आहे. आगामी महापालिका निवडणुकीपूर्वी चिघळलेला संघर्ष वेळीच शांत नाही केला तर मोठा अनर्थ घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. रंकाळा टॉवर परिसरात उमेश कांदेकर याच्या पाठीमागे तरुणांची फौज असल्याने कुळे काढणे, हप्तेवसुली करण्यामध्ये त्याची मोठी दहशत होती. त्याच्या खांद्याला खांदा लावून ग्रुपमध्ये मित्र प्रवीण लिमकर (बिल्डर), रणजित मोरस्कर हेदेखील काम करीत होते. मध्यंतरीच्या कालावधीत पैशाच्या देवाणघेवाणीतून याच परिसरातील राजेंद्र लोहार या तरुणाचा खून झाला. या प्रकरणात उमेश कांदेकरला अटकही झाली होती. लोहार गटातील समर्थक हे रणजितचे मित्र; त्यामुळे कांदेकरपासून तो बाजूला झाला. दरम्यान, कांदेकर या खून प्रकरणात तुरुंगात असल्याने प्रवीण लिमकरने या भागात आपला चांगलाच जम बसविला. आपले वर्चस्व वाढू लागल्याने तोही स्वतंत्र झाला. लोहार खून प्रकरणातून बाहेर आल्यानंतर कांदेकरने पुन्हा आपले वर्चस्व सिद्ध केले. जनसुराज्य पक्षातून नगरसेवकपदही मिळविले. दरम्यान, त्याच्या आकस्मिक निधनानंतर या परिसराचा ‘डॉन’ बनण्यासाठी मोरस्कर, लिमकर गटांकडून वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न झाला. परंतु उमेशचा भाऊ हेमंत कांदेकर या परिसराचा ‘डॉन’ म्हणून मिरवू लागला. मोरस्करचहीे या परिसरात वर्चस्व वाढू लागल्याने ‘कांदेकर विरुद्ध मोरस्कर’ असा संघर्ष सुरू झाला. हा संघर्ष नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत चिघळला. हेमंत कांदेकरने ‘मीच इथला डॉन आहे ’ अशी दमदाटी करीत आपल्या साथीदारांसमवेत मोरस्कर याच्या घरात घुसून खुनी हल्ला केला. दरम्यान, या वादातून मोरस्कर गटाकडूनही कांदेकर गटावर हल्ला झाल्याची फिर्याद लक्ष्मीपुरी व जुना राजवाडा पोलीस ठाण्यांत देण्यात आली. दोन्ही गटांवर परस्परविरोधी असे सात गुन्हे दाखल झाले आहेत. शुक्रवारी रात्री तर कांदेकर गटाचे समर्थक भोसले कुटुंबियांनाच राहत्या घरात पेटविण्याचा गंभीर प्रकार घडला. त्यामुळे या संघर्षाने भिषण रुप घेतले असून आताच कडक कारवाई करुन दहशत मोडण्याची गरज आहे. रंकाळा टॉवर परिसरात वर्चस्ववादातून कांदेकर व मोरस्कर गटांतील समर्थकांनी परिसरातील नागरिकांचे जीवन हैराण करून टाकले आहे. वारंवार एकमेकांविरुद्ध संघर्ष करणाऱ्या या टोळक्यांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका निवडणुकीपूर्वी या दोन्ही टोळ्यांना जिल्ह्यातून हद्दपार केले जाईल. - डॉ. मनोजकुमार शर्मा : पोलीस अधीक्षक पैलवानांचा वापर परप्रांतीय पैलवानांना राहण्यासाठी जागा देऊन त्यांचा वर्चस्वासाठी ढाल म्हणून वापर होऊ लागला. आजही या भागात पैलवानांचे जाळे मोठ्या प्रमाणात आहे. कांदेकर आणि मोरस्कर गट हे याच पैलवानांच्या जोरावर डॉन बनण्याचे स्वप्न पाहत आहेत. व्यवसायातही चढाओढरणजित मोरस्कर व कांदेकर गटाचा समर्थक किशोर भोसले या दोघांची रंकाळा चौपाटी येथे भेलची गाडी आहे. किशोर हा फेरीवाले संघटनेचा शहर अध्यक्ष बनल्याने रंकाळा चौपाटी येथे त्याचे फेरीवाल्यांत वर्चस्व वाढू लागले. व्यवसायातील चढाओढीतून भोसले-मोरस्कर असा संघर्ष आता उफाळला आहे.