शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

बहुराष्ट्रीय कंपन्यांचे आक्रमण रोखा

By admin | Updated: December 17, 2015 01:20 IST

वैद्यकीय प्रतिनिधींची निदर्शने : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

कोल्हापूर : स्वदेशीचा नारा देऊन सत्तेत बसलेल्या या सरकारने ‘यूएसएफडीए’सारख्या अमेरिकन औषध नियामक संस्थांना भारतात कार्यालय स्थापन करण्याची परवानगी देत भारतीय कंपन्यांवर नियमांचा बडगा उगारून औषध निर्यातीवरही बंधने लादण्याचा घाट घातला आहे. एकंदरीत बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या आक्रमणाविरोधात बुधवारी अखिल भारतीय वैद्यकीय प्रतिनिधींनी देशव्यापी संप पुकारला. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्य मेडिकल अ‍ॅँड हेल्थ रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशनच्या जिल्हा शाखेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करीत निदर्शने करून दिवसभर व्यवहार बंद ठेवले. दुपारी साडेबाराच्या सुमारास जिल्ह्यातील दीडशेंहून अधिक प्रतिनिधी या ठिकाणी जमा झाले. यानंतर जोरदार घोषणाबाजी करीत निदर्शने करण्यात आली. मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी शंकर बर्गे यांना देण्यात आले.इतर उद्योगांसोबतच विदेशी गंगाजळीसाठी केंद्रातील भाजप सरकारने औषध व आरोग्य क्षेत्रात १०० टक्के थेट विदेशी गुंतवणुकीला परवानगी दिली आहे. सार्वजनिक औषध उद्योगांनी १२५ कोटी भारतीयांना स्वस्त दरात औषध उपलब्ध करून दिल्याने ‘सर्वांसाठी चांगले आरोग्य’ आवाक्यात आणले असतानासुद्धा अशा सार्वजनिक औषध उद्योगांना ‘आजारी उद्योग’ म्हणून घोषित करण्यात येत आहेत. लहान मुलांना लागणाऱ्या अत्यावश्यक लसी उत्पादित करणारे कारखाने सबस्टॅँडर्ड ठरवून लसीकरणासाठी संपूर्णत: विदेशी औषध कंपन्यांवर अवलंबून राहावे लागत आहे. इतक्यावर न थांबता जीवनावश्यक औषधांच्या किमतीवरील नियंत्रण काढून घेऊन किमतीत प्रचंड वाढीची सवलत औषध कंपन्यांना बहाल करण्यात आली आहे. बहुराष्ट्रीय औषध कंपन्यांद्वारे क्लिनिकल ट्रायल्सच्या नावाने भारतीय रुग्णांवर जीवघेणे प्रयोग केले जात आहेत. याविरोधात वैद्यकीय प्रतिनिधींची संघटना सतत आंदोलन करीत आहे; परंतु त्याची दखल न घेतल्यामुळे देशव्यापी संपाचे हत्यार उपसण्यात आले आहे.आंदोलनात अध्यक्ष आशिष चव्हाण, अजित देसाई, समीर देसाई, विजय धनवडे, प्रशांत सावंत, अजित हवालदार, अरुण पाटील, विवेक गोडसे, आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)