शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

पट्टणकोडोली, हुपरी, कागलमध्ये कडकडीत बंद

By admin | Updated: November 9, 2014 00:49 IST

आक्षेपार्ह मजकूर प्रकरण : दोषींवर कारवाईची मागणी

 कागल/पट्टणकोडोली : सोशल मीडियावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रती आक्षेपार्ह मजकूर व छायाचित्र अपलोड करून विटंबना केल्याच्या निषेधार्थ पट्टणकोडोली (ता. हातकणंगले), कागल, हुपरी येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी दोषी समाजकंटकांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. बंद काळात वातावरण तणावपूर्ण बनल्याने पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान, कबनूर येथे रात्री नऊच्या सुमारास अज्ञातांनी एसटीवर दगडफेक केली. पट्टणकोडोलीत दोषी समाजकंटकांवर कारवाई करण्याची मागणी करीत आज, शनिवारी गाव बंदची हाक देण्यात आली होती. गावातील सर्व व्यापारी व व्यावसायिकांनी व्यवहार बंद ठेवून बंदला पाठिंबा दिला. बंद काळात तणावपूर्ण वातावरण बनल्याने पोलीस बंदोबस्त कायम असून सायंकाळी व्यवहार सुरळीत चालू झाले. दरम्यान, सकाळपासूनच गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आल्याने एस. टी. बसेसची वाहतूकही बंद करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थी व प्रवाशांचे हाल झाले. काहींनी वडापचा आधार घेतला, तर काहींनी चालत प्रवास केला. कागल : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सोशल मीडियावर विटंबना झाल्याच्या निषेधार्थ येथील दलित कार्यकर्त्यांच्यावतीने आज, शनिवारी कागलमध्ये बंद पाळण्यात आला. सकाळी नेहमीप्रमाणे शहरातील सर्व व्यवहार सुरू होते. साडेनऊच्या सुमारास कार्यकर्ते डॉ. आंबेडकर चौकातून घोेषणा देत बाहेर पडले आणि त्यांनी बंदचे आवाहन केले. तासाभरात शहरातील सर्व व्यवहार ठप्प झाले. शाळा, महाविद्यालये, विद्यालये. सोडण्यात आली. बसस्थानकावरील एस.टी. बसेस, केएमटी सेवाही रोखून धरण्यात आली. यामुळे विद्यार्थीवर्ग, नागरिक, प्रवासीवर्ग बसस्थानकात अडकून पडला होता. दुपारनंतर व्यवहार सुरू होऊ लागले.