शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
6
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
7
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
8
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
9
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
10
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
11
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
12
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
13
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
14
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
15
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

राज्याला मिळणार नवे २८९२ आरोग्य अधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:55 IST

समीर देशपांडे लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्यावतीने घेण्यात आलेल्या एक्झिट एक्झाममध्ये राज्यातील २८९२ उमेदवार ...

समीर देशपांडे

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्यावतीने घेण्यात आलेल्या एक्झिट एक्झाममध्ये राज्यातील २८९२ उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे या सर्वांची आता राज्यातील १५ हून अधिक जिल्ह्यांत आरोग्य उपकेंद्रांवर नियुक्ती करण्यात येणार आहेत. यासाठी येणाऱ्या आठवड्यात नियुक्तीचे आदेश देण्यात येणार आहेत.

ग्रामीण भागातील आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी प्रत्येक आरोग्य केंद्रांवर समुदाय आरोग्य अधिकारी नियुक्ती करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. १५ जिल्ह्यांमधील याबाबतची प्रक्रिया आधीच पूर्ण झाली आहे. आता राज्यातील उर्वरित जिल्ह्यांसाठी ही प्रक्रिया राबविण्यात आली आहे.

समुदाय आरोग्य अधिकारी पदासाठी तीन टप्प्यांत परीक्षा घेण्यात आली. सुरुवातीला बहुपर्यायी प्रश्न, नंतर सहा महिन्यांचे नाशिक येथे प्रशिक्षण आणि नंतर लेखी परीक्षा हे तीन टप्पे होते. या अंतिम लेखी परीक्षेसाठी राज्यातील ३०५१ उमेदवार बसले होते. त्यातील २८९२ जण उत्तीर्ण झाले आहेत.

या सर्वांची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली असून, गुणवत्तेनुसार त्यांची समुपदेश तत्त्वानुसार उपकेंद्रांवर नियुक्ती करायची आहे. त्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून, जिल्हा आरोग्य अधिकारी, आरोग्य उपसंचालक सदस्य, तर जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक समितीचे सचिव राहणार आहेत. समुपदेशनाच्या एक दिवस आधी गुणवत्ता यादी कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर आणि संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. १० डिसेंबरपर्यंत या नव्या आरोग्य अधिकाऱ्यांनी आपल्या कामाच्या ठिकाणी रुजू व्हायचे आहे.

---------------------------

तीन वर्षे सेवा न केल्यास १ लाख रुपये दंड

या उमेदवारांना सहा महिने नाशिक येथे प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्या दरम्यान त्यांना प्रतिमहिना १० हजार रुपये विद्यावेतन देण्यात आले आहे. त्यामुळे या प्रक्रियेनुसार नियुक्ती झाल्यानंतर कराराप्रमाणे जर जिल्ह्यात ३ वर्षे सेवा केली नाही तर अशा आरोग्य अधिकाऱ्यांना १ लाख ३ हजार रुपये दंड करण्यात येणार आहे. तसे करारनाम्यामध्ये नमूद करण्यात आले आहे.