इचलकरंजीत एकांकिका स्पर्धेस प्रारंभ

By Admin | Updated: December 30, 2016 00:15 IST2016-12-30T00:15:40+5:302016-12-30T00:15:40+5:30

‘दर्द पोरा’ ही वास्तववादी एकांकिका अत्यंत प्रभावी झाली.

Start of Ichalkaranji Ekanika Tournament | इचलकरंजीत एकांकिका स्पर्धेस प्रारंभ

इचलकरंजीत एकांकिका स्पर्धेस प्रारंभ

इचलकरंजी : येथील राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धेला उत्साहात सुरुवात झाली. सहभागी कलाकारांनी काश्मीरमधील सैनिक आणि आतंकवादी, महिलांवर होणारा अत्याचार, दर्द पोरा, स्वप्न असे नाट्याविष्कार सादर केले.येथील सामाजिक संस्थांच्यावतीने आयोजित एकांकिका स्पर्धेत गोवा येथील कलाकारांनी विविधरंगी नाट्याविष्कार सादर करून
प्रेक्षकांची वाहवा मिळवली. तसेच रंगयात्रा इचलकरंजी यांची काश्मीरमधील सैनिक आणि आतंकवादी, महिलांवर होणारा अत्याचार यावर प्रकाशझोत टाकणारी ‘दर्द पोरा’ ही वास्तववादी एकांकिका अत्यंत प्रभावी झाली. मिरज येथील कॉम्प्युटर एज्युकेशन सोसायटीच्या कलाकारांनी ‘स्वप्न’ ही एकांकिका सादर केली. धरणी कलासृष्टी गोवा यांनी ‘ध्यानी मनी’ ही एकांकिका सादर केली. मुलाविना असणाऱ्या पण आपणास मूल आहे, अशी कल्पना करून घेणाऱ्या दाम्पत्याची व त्यांच्या डॉक्टरची ही कथा होती. कथेत शेवटच्या क्षणी दु:खात बुडाल्यावर पती पत्नीला परस्परांचं अस्तित्व जाणवतं आणि दोघे भानावर येतात, अशी कथा आहे.
रंगयात्रा इचलकरंजी यांनी ‘मडवॉक’ ही एकांकिका सादर केली. उत्कृष्ट नेपथ्य, पार्श्वसंगीत, सूचक प्रकाश योजना यांनी सजलेली, गंभीर आशयाची ही एकांकिका अतिशय चांगल्या प्रकारे सादर केली.
श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात झालेल्या या एकांकिकांना विद्यार्थी आणि प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. (वार्ताहर)


इचलकरंजीतील एकांकिका स्पर्धेत ‘मडवॉक’ ही एकांकिका सादर करताना रंगयात्रा इचलकरंजीचे कलाकार.

Web Title: Start of Ichalkaranji Ekanika Tournament