महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी बससेवा सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:51 IST2020-12-11T04:51:20+5:302020-12-11T04:51:20+5:30

अर्जुनवाड : कोरोनाचा रोगप्रसार कमी होत असल्याने शाळा, महाविद्यालये सुरू झाली आहेत. शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड, शिरोळ, जयसिंगपूरमधील शाळा-महाविद्यालयांना ये-जा ...

Start bus service for college students | महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी बससेवा सुरू करा

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी बससेवा सुरू करा

अर्जुनवाड : कोरोनाचा रोगप्रसार कमी होत असल्याने शाळा, महाविद्यालये सुरू झाली आहेत. शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड, शिरोळ, जयसिंगपूरमधील शाळा-महाविद्यालयांना ये-जा करण्यासाठी परिसरातील गावांमधून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी येत असतात. त्यांची प्रवासाची गैरसोय होत आहे. त्यामुळे बससेवा सुरू करावी, अशा मागणीचे निवेदन युवा सेनेच्या वतीने कुरुंदवाड आगाराला देण्यात आले. आगार व्यवस्थापक दयानंद पाटील यांनी निवेदन स्विकारले.

युवासेनेचे तालुकाप्रमुख प्रतीक धनवडे यांच्या नेतृत्वाखाली शिरोळ तालुक्यातील महाविद्यालय परिसरातील गावामधून विद्यार्थ्यांच्या सोईसाठी बससेवा सुरू करण्याबाबत मागणी करण्यात आली. यावेळी युवासेनेचे तालुका समन्वयक नीलेश तवंदकर, उपतालुकाप्रमुख मंगेश पाटील, श्रेणिक माने, आकाश थरपट्टी, अमोल पाटील, मल्हार कुलकर्णी, अनिल खाडे, प्रतीक पाटील, आदित्य पाटील, ऋषिकेश चव्हाण, अभय पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

फोटो - १०१२२०२०-जेएवाय-०५

फोटो ओळ - युवासेनेच्या वतीने कुरुंदवाड आगार व्यवस्थापक दयानंद पाटील यांना निवेदन देण्यात आले.

Web Title: Start bus service for college students