शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

स्टार ११७६: अंगणवाडी सेविका नॉट रिचेबल, ऑफलाइन अहवालाचा ताण वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:27 IST

कोल्हापूर : सोयीपेक्षा गैरसोयच जास्त होत असल्याने वैतागून प्रशासनाकडे मोबाइल परत पाठविलेल्या अंगणवाडी सेविकांना आता ऑफलाइन अहवालाचा नवा ताप ...

कोल्हापूर : सोयीपेक्षा गैरसोयच जास्त होत असल्याने वैतागून प्रशासनाकडे मोबाइल परत पाठविलेल्या अंगणवाडी सेविकांना आता ऑफलाइन अहवालाचा नवा ताप सोसावा लागत आहे. पूर्वीप्रमाणे ऑफलाइन अहवाल पाठवावा लागत असल्याने एकूणच संवादाची आणि कामाची घडी विसकटून गेली आहे.

काम सुलभ व्हावे म्हणून अडीच वर्षांपूर्वी सर्व अंगणवाडी सेविकांना शासनाकडून मोफत मोबाइल हॅण्डसेट देण्यात आले. दुरुस्तीचा खर्च परवडत नसल्याने अंगणवाडी सेविकांनी आपले मोबाइल जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागाकडे मोर्चा काढून जमा केले आहेत. कामाचे स्वरूप विस्तारले असल्याने अद्ययावत पद्धतीचे मोबाइल द्यावेत, अशी त्यांची मागणी आहे, पण याकडे सरकारने दुर्लक्ष केल्याने वैतागून या सेविकांनी २० दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेत आणून मोबाइल जमा केले.

गेल्या तीन वर्षांपासून अंगणवाडीची सर्व कामे बऱ्यापैकी मोबाइलवरच केली जात होती. महिला बालकल्याण विभागाकडून आलेल्या ॲपवर सर्व माहिती भरली जात असल्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांचाही वेळ वाचत होता. आता पुन्हा जुन्या पद्धतीने अहवाल पाठवावे लागत आहेत, पण हे अहवाल लिहिण्यासाठीच्या विशिष्ट प्रकारच्या वह्या कोण खरेदी करणार असा नवाच पेच निर्माण झाला आहे. पूर्वी ग्रामपंचायतीकडून सादीलवार खर्चात याची नोंद केली जात होती. मोबाइलवर काम सुरू झाल्यापासून ग्रामपंचायतीने हा खर्च देणे बंद केले आहे. राज्य सरकारकडून ४०० रुपयांचा डेटा पॅक दिला जात असल्याने याद्वारेच अहवाल पाठविले जात होते. आता मोबाइलच नसल्याने हा पॅकदेखील नाही, त्यामुळे या अंगणवाडी सेविकांना अधिकाऱ्यांशी संपर्क साधणेही अडचणीचे झाले आहे.

कामाचा भार पेलवेना

अंगणवाडी सेविकांना रोजच्या रोज अहवाल तयार करून ते मोबाइलवरील ॲपद्वारे अपलोड करावे लागतात. यात मुलांच्या वजनापासून ते त्यांना दिल्या जाणाऱ्या आहारापर्यंत आणि शासनाकडून आलेल्या पोषण आहार, इतर साहित्याच्या मोजमाप व साठ्याचीदेखील माहिती यावर द्यावी लागते. याशिवाय बालके, स्तनदा, गरोदर माता या सर्वांच्या लसीकरणासह आहार वाटपाचीदेखील माहिती रोजच्या रोज पाठवावी लागते. आता मोबाइलच नसल्याने ते हाताते लिहून पाठवावे लागत आहे.

म्हणून केले मोबाइल परत

या मोबाइलची रॅम कमी आहे, फाईल सेव्ह करण्याचे प्रमाण वाढले की हॅण्डसेट गरम होताे, हँग होतो. रेंजचीही अडचण येत आहे. पोषण ट्रेकर ॲप तर डाऊनलोड होत नाही. याची दुरुस्ती करायची म्हटली तर किमान ५ ते ७ हजारांवर खर्च येतो. मुळातच हे मोबाइल देऊन अडीच वर्षे झाल्याने त्याचे आयुष्यही संपले आहे. आता नवीन अँड्रॉइड मोबाइल दिले तरच कामाचा वेग वाढणार आहे.

जिल्ह्यातील अंगणवाड्या : ४३६९

अंगणवाडी सेविका : ३९९९

मोबाइल परत केलेल्या सेविकांची संख्या : ३९९९

‘असून अडचण, नसून खोळंबा’

मोबाइलमुळे लिहिण्याची सवय राहिलेली नाही. ज्या कामासाठी दिवसातील काही तास लागायचे ते काम मिनिटांत होऊ लागले होते; पण हॅण्डसेट दुरुस्तीचा, मोबाइल हँग होण्याची डोकेदुखी जास्त होत असल्याने वैतागून मोबाइल परत केले; पण आता ‘असून अडचण, नसून खोळंबा’ अशी परिस्थिती ओढवली आहे.

प्रतिक्रिया

मोबाइल सेविकांना परत द्यावेत असे शासनाचे पत्र आले आहे. त्यानुसार तालुक्याकडे ते पाठविले असून, पोषण ट्रॅकशिवाय अन्य कामासाठी मोबाइलचा वापर होत असल्याने त्यांनी तो स्वीकारावा, दुरुस्तीचे काय करायचे याबाबत विचार करू.

शिल्पा पाटील,

उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला बालकल्याण