राधानगरीच्या सभापतीपदी सोनाली पाटील की वंदना हळदे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:10 IST2021-02-20T05:10:47+5:302021-02-20T05:10:47+5:30

आमजाई व्हरवडे (सुनील चौगले) : राधानगरीच्या सभापती सुशिला भावके यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर राष्ट्रवादीच्या वंदना ...

Sonali Patil or Vandana Halde as the Speaker of Radhanagari? | राधानगरीच्या सभापतीपदी सोनाली पाटील की वंदना हळदे?

राधानगरीच्या सभापतीपदी सोनाली पाटील की वंदना हळदे?

आमजाई व्हरवडे (सुनील चौगले) : राधानगरीच्या सभापती सुशिला भावके यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर राष्ट्रवादीच्या वंदना हळदे (खामकरवाडी) व सोनाली पाटील (सोळांकूर) यापैकी कुणाला संधी मिळणार? याकडे नजरा लागल्या आहेत. पंचायत समितीच्या निवडणुकीला अजून एक वर्षाचा अवधी असल्याने सहा-सहा महिन्यांचा अवधी मिळणार? असल्याने पहिली संधी कुणाला मिळणार, याचीच उत्सुकता आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष ए. वाय. पाटील हे हा निर्णय घेणार असल्याने ते कुणाच्या गळ्यात सभापती पदाची माळ घालणार, हे बुधवारी २४ तारखेला स्पष्ट होईल.

पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी पाच, काँग्रेस चार व शिवसेनेला एक जागा मिळाली होती. पहिली तीन वर्षे राष्ट्रवादीचे दिलीप कांबळे यांना सभापती, तर काँग्रेसचे रवीश पाटील-कौलवकर यांना संधी मिळाली होती. त्यानंतर आरक्षण बदलल्यानंतर राष्ट्रवादीच्या रूपाली पाटील यांना सात महिने संधी मिळाली होती, तर उपसभापती काँग्रेसचे उत्तम पाटील यांना संधी मिळाली होती. दीपाली पाटील यांचा राजीनामा घेऊन एकमेव सदस्य पद असलेल्या शिवसेनेच्या सुशिला भावके यांना सभापतिपदाची संधी देऊन ए. वाय. पाटील यांनी मोठेपण दाखवले होते. सुशिला भावके यांनी गेल्या महिन्यात राजीनामा दिल्याने उपसभापती मोहन पाटील यांना प्रभारी सभापती म्हणून पदभार दिला आहे.

बुधवारी २४ फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजता तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड होत असल्यामुळे या निवडीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत

Web Title: Sonali Patil or Vandana Halde as the Speaker of Radhanagari?