आईचा खून करणारा मुलगा अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:52 IST2021-02-05T06:52:00+5:302021-02-05T06:52:00+5:30

आईचा खून करणारा नराधम पोलिसांच्या ताब्यात * मार्च २०२० मधील घटना : गडहिंग्लज तालुक्यातील आरोपीला कोल्हापूरमध्ये अटक गडहिंग्लज : ...

Son arrested for mother's murder | आईचा खून करणारा मुलगा अटकेत

आईचा खून करणारा मुलगा अटकेत

आईचा खून करणारा नराधम पोलिसांच्या ताब्यात

* मार्च २०२० मधील घटना : गडहिंग्लज तालुक्यातील आरोपीला कोल्हापूरमध्ये अटक

गडहिंग्लज : किरकोळ भांडणातून दारूच्या नशेत डोक्यावर लाकडाने प्रहार करून वयोवृद्ध आईचा खून करणाऱ्या विनायक शंकर जावळे या नराधमाला गडहिंग्लज पोलिसांनी कोल्हापूरमधून ताब्यात घेतले. विनायक हा मार्च २०२० मध्ये आईचा खून करून तब्बल ११ महिने फरार झाला होता. सोमवारी ( दि.१) त्याला न्यायालयासमोर उभे केले असता, न्यायालयाने त्याला गुरुवार (४) अखेर चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पोलिसातून मिळालेली माहिती अशी, गडहिंग्लज तालुक्यातील वडरगे येथे १५ मार्च २०२० रोजी रात्री साडेआठच्यासुमारास विनायकने आपली आई सुनंदा शंकर जावळे (वय ६५) हिचा डोक्यावर लाकडाने वर्मी घाव घालून खून केला व पोबारा केला होता. गडहिंग्लज पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण प्थकातर्फे त्याचा तपास सुरू होता. निपाणी व माकडवाला वसाहतीमध्ये पोलिसांकडून तपास सुरू असताना तो माकडवाला वसाहतीमध्ये सापडला.

* व्यसनी आणि भांडखोर संशयित आरोपी विनायक हा अविवाहित असून, त्याला दारूचे व्यसन आहे. किरकोळ कारणावरून तो नेहमी आईशी भांडण-तंटा करायचा. अशा भांडणातच त्याने लाकडी पट्टीने आईच्या डोक्यावर मारहाण केली. त्यातच तिचा दुर्देवी अंत झाला होता.

--------------------------------

* नाब बदलून गुंगारा

आईच्या खुनानंतर फरार विनायक हा कोल्हापूरमधील माकडवाला वसाहतीमध्ये राहत होता. उदरनिर्वाहासाठी तेथील एका बांधकामाच्या ठिकाणी सेंट्रिंग कामगार म्हणून तो काम करत होता. तब्बल ११ महिने त्याने नाव बदलून पोलिसांना गुंगारा दिला होता.

--------------------------------

* * विनायक जावळे : १६०३२०२०-गड-०७

Web Title: Son arrested for mother's murder