शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
6
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
7
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
8
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
9
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
10
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
11
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
12
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
13
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
14
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
15
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

गडहिंग्लज कारखान्यासंदर्भातील सोमय्या यांचे आरोप निखालस खोटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:28 IST

गडहिंग्लज : माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्यासंदर्भात ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर केलेला ...

गडहिंग्लज :

माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्यासंदर्भात ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर केलेला आरोप निखालस खोटा आहे,असे स्पष्टीकरण कारखान्याच्या उपाध्यक्षांसह ७ संचालकांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिले आहे.

सोमय्या यांनी कराड येथील पत्रकार परिषदेत मंत्री मुश्रीफ यांनी

२ वर्षांपूर्वी केडीसीसी बँकेच्या माध्यमातून गडहिंग्लज कारखाना लिलावात घेतल्याचा आरोप केला आहे,तो पूर्णपणे चुकीचा आहे. त्यांचा गडहिंग्लज कारखान्याच्या आर्थिक व्यवहारांशी कोणत्याही प्रकारचा संबंध नाही,असेही पत्रकात स्पष्ट केले आहे.

पत्रकात पुढे म्हटले आहे,केवळ गडहिंग्लज विभागाचा लोकप्रतिनिधी या नात्यानेच

८ वर्षापूर्वी मुश्रीफ यांनी

आर्थिक अरिष्टात सापडलेला

गडहिंग्लज कारखाना शेतकरी, कामगार,ऊसतोडणी- वाहतूकदार यांच्या हितासाठी पुण्यातील ब्रिस्क फॅसिलिटीज कंपनीला सहयोग तत्वावर चालवायला देण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यासंबंधीचा करार राज्य शासनाच्या परवानगीनेच साखर आयुक्तांसमोर झाला आहे. त्या प्रक्रियेशी केडीसीसी बँकेचा दुरान्वयेदेखील संबंध नाही.

ब्रिस्क कंपनीने ७० कोटींचा तोटा सहन करून ८ वर्षे कारखाना समर्थपणे चालविला. कराराची मुदत १० वर्षे असतानाही परवडत नसल्यामुळेच कंपनीने ६ महिन्यांपूर्वीच कारखाना संचालक मंडळाकडे सोपविला आहे.

पत्रकावर, गडहिंग्लज कारखान्याचे उपाध्यक्ष डॉ. संग्रामसिंह नलवडे, संचालक व माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील -गिजवणेकर, संचालक अमर चव्हाण,विद्याधर गुरबे, दीपक जाधव, प्रकाश पताडे, संचालिका जयश्री पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

..............

जनतेला संभ्रमात टाकू नका !

सोमय्या यांना शेतकरी जीवंत राहिला पाहिजे याची तळमळच दिसत नाही. शेतकऱ्यांच्या व्यथा काय असतात, हे त्यांनी आधी जाणून घ्यावे. कोणतीही माहिती नसताना बेछूट वक्तव्य करून जनतेला संभ्रमात टाकू नये,असेही संचालकांनी पत्रकात म्हटले आहे.