निःशस्त्र पोलीस निरीक्षक पदोन्नती पात्र यादीत जिल्ह्यातील सहाजण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:55 IST2021-02-05T06:55:28+5:302021-02-05T06:55:28+5:30
कोल्हापूर : निःशस्त्र पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नतीसाठी महसुली संवर्गाची माहिती मागविली आहे. या पदोन्नतीच्या निवड सूचीच्या पात्र यादीत ...

निःशस्त्र पोलीस निरीक्षक पदोन्नती पात्र यादीत जिल्ह्यातील सहाजण
कोल्हापूर : निःशस्त्र पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नतीसाठी महसुली संवर्गाची माहिती मागविली आहे. या पदोन्नतीच्या निवड सूचीच्या पात्र यादीत जिल्ह्यातील सहा सहायक पोलीस निरीक्षकांचा समावेश होण्याची शक्यता आहे.
राज्यातील रिक्त पोलीस निरीक्षक पदावर सहायक पोलीस निरीक्षकांना पदोन्नती देण्यात येत आहे. त्यानिमित्त पोलीस महासंचालक कार्यालयाकडून महसुली संवर्गाची माहिती मागविली आहे. यात निःशस्त्र सहायक पोलीस निरीक्षक पदावरून निःशस्त्र पोलीस निरीक्षकपदी पदोन्नतीसाठी निवडसूचीवर जिल्ह्यातील सहा सहायक पोलीस निरीक्षकांचा समावेश असेल. संगीता पाटील, संभाजी काळे, प्रज्ञा चव्हाण, नंदकुमार मोरे, बाजीराव सूर्यवंशी, सुशांत चव्हाण, मंगेश देसाई, आदींचा समावेश आहे. हा प्रस्ताव मंजुरीनंतर संबंधितांना पोलीस निरीक्षकपदी बढती मिळेल. जिल्ह्यातील सहा सहायक पोलीस निरीक्षकांचा एकाच वेळी बढतीच्या पात्र यादीत समाविष्ट होणार असल्याचे समजते.
राज्यातील विभाग व पोलीस निरीक्षकांची रिक्त पदे
- नागपूर : ३५
- अमरावती : १७
- औरंगाबाद : २२
- कोकण : ०७
- नाशिक : ०९
- पुणे : ६२