शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील रस्त्यांसाठी सहा कोटींची मागणी --:दौलत देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 10:29 IST

या मागणीनंतर जिल्हाधिकारी म्हणाले, ‘राज्यात आपत्ती व्यवस्थापन प्रमुख म्हणूनदेखील मी काम केले आहे; त्यामुळे नियमानुसार राष्ट्रीय आपत्ती अंतर्गत कोल्हापूरसाठी सहा कोटी ६३ लाखांच्या निधीची मागणी केली जाईल. ही प्रशासकीय बाब असल्याने त्यावर राज्यात सरकार स्थापन नसल्याचा परिणाम होणार नाही, असेही ते म्हणाले.

ठळक मुद्देकोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीचे निवेदन

कोल्हापूर : अतिवृष्टी व महापुरामुळे कोल्हापूर शहरातील खराब झालेल्या रस्त्यांसाठी प्रतिकिलोमीटर एक लाख रुपये याप्रमाणे राष्ट्रीय आपत्ती अंतर्गत केंद्राकडे सहा कोटी ६३ लाखांच्या निधीची मागणी करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली. सोमवारी कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीदरम्यान ते बोलत होते.

महापुरानंतर कोल्हापुरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे, या पार्श्वभूमीवर शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी कृती समितीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पावसामुळे शहरातील सर्वच रस्ते खराब झाले आहेत. महापालिकेकडे स्वत:चा फंड नाही; मात्र कोल्हापुरातून महाराष्ट्र शासनाकडे विविध कराच्या माध्यमांतून दरवर्षी हजारो कोटी रुपयांचा कर भरला जातो. ही रक्कम शासनाच्या नियोजित उद्दिष्ट्यांपेक्षा शेकडो कोटीने जास्त आहे; त्यामुळे शासनाने आपली जबाबदारी समजून या कोल्हापुरातील रस्त्यांसाठी निधी दिला पाहिजे. जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख म्हणून आपण केंद्र व राज्य शासनाकडून हा निधी महापालिकेस उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

या मागणीनंतर जिल्हाधिकारी म्हणाले, ‘राज्यात आपत्ती व्यवस्थापन प्रमुख म्हणूनदेखील मी काम केले आहे; त्यामुळे नियमानुसार राष्ट्रीय आपत्ती अंतर्गत कोल्हापूरसाठी सहा कोटी ६३ लाखांच्या निधीची मागणी केली जाईल. ही प्रशासकीय बाब असल्याने त्यावर राज्यात सरकार स्थापन नसल्याचा परिणाम होणार नाही, असेही ते म्हणाले. यावेळी अशोक पोवार, रमेश मोरे, अजित सासणे, अ‍ॅड. पंडितराव सडोलीकर, अशोक रामचंदाणी, दादासो लाड, भरत रसाळे, सुभाष देसाई, भाऊ घोडके, राहुल ढवळे, उत्तम वंदुरे, पांडुरंग आडसुळे, किरण पडवळ, संभाजीराव जगदाळे, चंद्रकांत सूर्यवंशी उपस्थित होते. कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीच्या शिष्टमंडळाने सोमवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे केंद्र व राज्य शासनाकडून कोल्हापुरातील रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMuncipal Corporationनगर पालिकाcommissionerआयुक्त