पाटणेफाटा येथे ट्रामा केअरसाठी जागेची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:18 IST2021-05-31T04:18:12+5:302021-05-31T04:18:12+5:30

चंदगड : हलकर्णी (ता. चंदगड) येथील औद्योगिक वसाहतीत (पाटणे फाटा) सुरू होणाऱ्या ट्रामा केअर हॉस्पिटलसाठी आज (रविवारी) आमदार ...

Site inspection for Trauma Care at Patnephata | पाटणेफाटा येथे ट्रामा केअरसाठी जागेची पाहणी

पाटणेफाटा येथे ट्रामा केअरसाठी जागेची पाहणी

चंदगड : हलकर्णी (ता. चंदगड) येथील औद्योगिक वसाहतीत (पाटणे फाटा) सुरू होणाऱ्या ट्रामा केअर हॉस्पिटलसाठी आज (रविवारी) आमदार राजेश पाटील यांनी एम. आय. डी. सी.चे प्रादेशिक अधिकारी धनंजय इंगळे, तहसीलदार विनोद रणावरे, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, डॉ. एस. एस. साने, डॉ. आर. के. खोत यांच्यासमवेत जागेची पाहणी केली.

यावेळी आमदार राजेश पाटील यांनी ही जागा येत्या महिन्याभरात प्रत्यक्ष ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे पाठपुरावा केला जाईल व प्रत्यक्ष बांधकामाला ऑक्टोबर व नोव्हेंबरमध्ये सुरुवात करण्यात येईल, असे सांगितले. यावेळी तानाजी गडकरी, पांडुरंग बेनके व अधिकारी उपस्थित होते.

------------------------

* फोटो ओळी : (पाटणे फाटा, ता. चंदगड) येथील औद्योगिक वसाहतीत येथे सुरू होणाऱ्या ट्रामा केअर हॉस्पिटलच्या जागेची आमदार राजेश पाटील यांनी पाहणी केली. यावेळी प्रादेशिक अधिकारी धनंजय इंगळे, तहसीलदार विनोद रणावरे, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, डॉ. एस. एस. साने, डॉ. आर. के. खोत उपस्थित होते.

क्रमांक : ३००५२०२१-गड-०८

Web Title: Site inspection for Trauma Care at Patnephata