शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
2
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
3
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
4
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
5
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
6
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
7
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
8
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
9
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
10
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
11
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
12
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
13
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
14
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
15
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
16
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
17
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
18
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
19
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
20
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

कुरुंदवाड येथे मुख्याधिकारी दालनासमोर ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:21 IST

शहरातील लाॅकडाऊनबाबत मुख्याधिकारी निखिल जाधव दंडात्मक कारवाई करताना पक्षपाती करत असल्याच्या निषेधार्थ माजी नगरसेवक दीपक पोमाजे व शिवसेना माजी ...

शहरातील लाॅकडाऊनबाबत मुख्याधिकारी निखिल जाधव दंडात्मक कारवाई करताना पक्षपाती करत असल्याच्या निषेधार्थ माजी नगरसेवक दीपक पोमाजे व शिवसेना माजी शहरप्रमुख राजू आवळे यांनी मुख्याधिकारी दालनासमोर ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले होते. अखेर शहर काँग्रेस अध्यक्ष विजय पाटील व पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील यांनी शिष्टाई करत वाद मिटविल्याने तणाव निवळला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात कडक लाॅकडाऊन आहे. शुक्रवारी दुपारी काही मुले क्रिकेट खेळून परतत असताना मास्क वापरले नसल्याच्या कारणावरून मुख्याधिकारी जाधव यांनी मुलांना पोलीस ठाण्यात नेऊन प्रत्येकी पाचशे रुपयांची दंडात्मक कारवाई केली, तर दुसरीकडे उपनगराध्यक्ष निवडीवेळी समर्थकांनी जल्लोषी मिरवणूक काढली असताना मुख्याधिकारी जाधव यांनी केवळ दहाजणांवर शंभर रुपयेप्रमाणे दंडात्मक कारवाई केली.

लाॅकडाऊन नियम भंगाबाबत दंडात्मक कारवाईत लोकप्रतिनिधींना एक, तर सर्वसामान्यांना वेगळा नियम लावून कारवाईत पक्षपाती केल्याच्या निषेधार्थ पोमाजे व आवळे हे मुख्याधिकारी जाधव यांना जाब विचारण्यासाठी मुख्याधिकारी कक्षाजवळ गेले. मात्र, मुख्याधिकारी जाधव यांनी दालनात प्रवेशास परवानगी न दिल्याने दालनासमोरच ठिय्या आंदोलन केले.

वाद चिघळण्याची शक्यता असल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले. आंदोलन आपल्या मतावर, तर मुख्याधिकारी भेट न देण्यावर ठाम असल्याने वातावरण तणावपूर्ण बनले होते.

यावेळी काँग्रेस गटनेते पाटील यांनी मुख्याधिकारी जाधव यांची, तर पोलीस उपनिरीक्षक पाटील यांनी आंदोलकांची समजूत काढत आंदोलन मिटविल्याने तणाव निवळला. मात्र, कारवाईबाबत मुख्याधिकारी यांची पक्षपाती आणि हटवादी भूमिका शहरात चांगलीच रंगली आहे.

फोटो - कुरुंदवाड येथे मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्या विरोधात मुख्याधिकारी कक्षासमोर ठिय्या आंदोलन करणाऱ्यांची पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील यांनी समजूत काढली.