लक्ष्मीपुरीसह शहरातील सर्व बाजारपेठांमध्ये शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:21 IST2021-04-12T04:21:08+5:302021-04-12T04:21:08+5:30

गेल्या दोन दिवसांपासून लाॅकडाऊनमुळे संपूर्ण बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे नेहमी गजबजलेली लक्ष्मीपुरी बाजारपेठ रविवारचा आठवडा बाजार ...

Shukshukat in all the markets of the city including Laxmipuri | लक्ष्मीपुरीसह शहरातील सर्व बाजारपेठांमध्ये शुकशुकाट

लक्ष्मीपुरीसह शहरातील सर्व बाजारपेठांमध्ये शुकशुकाट

गेल्या दोन दिवसांपासून लाॅकडाऊनमुळे संपूर्ण बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे नेहमी गजबजलेली लक्ष्मीपुरी बाजारपेठ रविवारचा आठवडा बाजार असूनही अगदी मोकळी, निर्मनुष्य झाली होती. शनिवारी काही अंशी या भागात लाॅकडाऊन असूनही वर्दळ सुरू होती. मात्र, पोलिसांच्या कारवाईच्या धसक्याने ही आतून सुरू असलेली दुकानेही पूर्णत: बंद होती. त्यामुळे संपूर्ण बाजारपेठेत अक्षरश: शुकशुकाट पसरला होता. यासोबतच गंगावेश येथील पाडळकर मार्केट, कपिलतीर्थ, गंगावेश शाहू उद्यानमागील बाजारपेठ, राजारामपुरी बारावी गल्लीतील बाजारपेठ, राजाराम टिंबर मार्केट, आदी परिसरांतील भाजीबाजारही गेल्या दोन दिवसांपासून पूर्णत: बंद असल्यामुळे या परिसरातही शुकशुकाट जाणवला.

फोटो : ११०४२०२१-कोल-लक्ष्मीपुरी०१,०२

आेळी : कोल्हापुरात नेहमी गजबजलेला लक्ष्मीपुरीतील बाजार रविवारी आठवडा बाजार असूनही असा लाॅकडाऊनमुळे निर्मनुष्य झाला होता.

फोटो : ११०४२०२१-कोल-लक्ष्मीपुरी०३

आेळी : कोल्हापुरात लाॅकडाऊनमुळे नेहमी गजबजलेला लक्ष्मीपुरीतील मिलन हाॅटेल ते लक्ष्मीपुरी बाजारपेठेकडे जाणारा रस्ता रविवारी असा निर्मनुष्य झाला होता.

फोटो : ११०४२०२१-कोल-कपिलतीर्थ

ओळी : लाॅकडाऊनमुळे कोल्हापुरातील नेहमी गजबजलेल्या कपिलतीर्थ मार्केटमध्येही रविवारी शुकशुकाट होता.

(छाया : नसीर अत्तार)

Web Title: Shukshukat in all the markets of the city including Laxmipuri