१६ मंडळांना ‘कारणे दाखवा’ नोटीस

By Admin | Updated: December 30, 2016 01:03 IST2016-12-30T01:03:36+5:302016-12-30T01:03:36+5:30

डॉल्बी प्रकरण : हिंदवी, दयावान, वाघाची तालीम, फिरंगाई, पीटीएमचा समावेश

Show 'Show Causes' Notice to 16 Circles | १६ मंडळांना ‘कारणे दाखवा’ नोटीस

१६ मंडळांना ‘कारणे दाखवा’ नोटीस

कोल्हापूर : यंदाच्या सार्वजनिक गणेशोत्सव मिरवणुकीत ध्वनिप्रदूषण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी कोल्हापूर शहरातील १६ मंडळांच्या अध्यक्षांना गुरुवारी शहर पोलिस उपअधीक्षक भारतकुमार राणे यांनी ‘कारणे दाखवा’ नोटिसा बजावल्या.
या नोटिसांमध्ये बागल चौक तरुण मंडळ, फिरंगाई तालीम मंडळ, राजे संभाजी तरुण मंडळ, लक्षतीर्थ वसाहतीमधील पिंटू मिसाळ बॉईज, रंकाळावेस तालीम मंडळ, प्रॅक्टिस क्लब, क्रांती बॉईज, वाघाची तालीम मंडळ, आदी गणेशोत्सव मंडळांचा समावेश आहे. यंदा १५ ते २९ सप्टेंबर २०१६ या कालावधीत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी विसर्जनमिरवणुकीमध्ये डॉल्बी सिस्टीमचा वापर केला होता. पर्यावरण संरक्षण आणि ध्वनिप्रदूषण नियमन व नियंत्रण नियमांचा त्यांनी भंग केला होता. या प्रकरणी गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष, डॉल्बी सिस्टीमचे मालक, ट्रॅक्टरचालक अशा एकूण १६ गणेशोत्सव मंडळांना गुरुवारी पोलिस उपअधीक्षक राणे यांनी नोटीस बजावली. त्यामुळे मंडळांच्या अध्यक्षांचे धाबे दणाणले आहेत.
मंडळांच्या अध्यक्षांची नावे : १) सचिन शिवाजीराव पाटील (रा. बागल चौक), बागल चौक तरुण मंडळ. २) आेंकार विलास वायफळकर (सरनाईक गल्ली, शिवाजी पेठ), फिरंगाई तालीम मंडळ . ३) रोहन रवींद्र जाधव (मरगाई गल्ली, शिवाजी पेठ), राजे संभाजी तरुण मंडळ. ४) अजित बाळासाहेब शिंदे (लक्षतीर्थ वसाहत), पिंटू मिसाळ बाईज. ५) अजिंक्य महेश साळोखे (मंगळवार पेठ), पाटाकडील तालीम मंडळ. ६) संतोष रमेश पाटील (संध्यामठ गल्ली, शिवाजी पेठ), बी. जी. एम. स्पोर्टस. ७) अर्जुन रमेश पिंगळे (बाबूजमाल), बाबूजमाल तालीम मंंडळ. ८) विनोद वसंतराव साळोखे (उत्तरेश्वर पेठ), वाघाची तालीम मंडळ. ९) मानसिंग जयसिंग पोवार (शिवाजी पेठ), आझाद हिंद तरुण मंडळ - दयावान गु्रप. १०) शिरीष शरद करंबे (शिवाजी पेठ), हिंदवी स्पोर्टस. ११)अमोल सुरेश पालोजी (हरिओमनगर), कै. उमेश कांदेकर युवा मंच, रंकाळा टॉवर. १२) नामदेव दादोबा लोहार (रंकाळा टॉवर), क्रांती बॉईज. १३) सचिन यशवंत गायकवाड (रंकाळा टॉवर), रंकाळावेस तालीम मंडळ. १४) योगेश दीपक मोहिते (राजारामपुरी १२ वी गल्ली), गणेश तरुण मंडळ. १५) संतोष दिनकर माळी (मंगळवार पेठ), प्रॅक्टिस क्लब, सुबराव गवळी तालीम मंडळ. १६) संतोष मधुकर गायकवाड (पाण्याचा खजिना), नंगीवली तालीम मंडळ.
';

Web Title: Show 'Show Causes' Notice to 16 Circles