संक्षिप्त वृत्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:20 IST2021-02-08T04:20:29+5:302021-02-08T04:20:29+5:30

शिरोळ : नांदणी ते भैरववाडीकडे जाणाऱ्या मार्गाच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून या मार्गाची मोठी ...

Short story | संक्षिप्त वृत्त

संक्षिप्त वृत्त

शिरोळ : नांदणी ते भैरववाडीकडे जाणाऱ्या मार्गाच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून या मार्गाची मोठी दुरवस्था झाली होती. रस्त्यातील खड्डयांमुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. सध्या या मार्गावर डांबरीकरणाचे काम सुरू करण्यात आल्याने वाहनधारकांतून समाधान व्यक्त होत आहे.

---------------

बेशिस्त पार्किंगवर कारवाई करा

जयसिंगपूर : शहरातील अकराव्या गल्लीत दुचाकीसह चारचाकी वाहने रस्त्यावरच बेशिस्तपणे पार्किंग केले जात आहे. यामुळे वाहनधारकांसह पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. एखाद्या वेळेस समोरून वाहन येत असेल तर वाहतुकीची कोंडीदेखील होण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे या ठिकाणी असणाऱ्या बेशिस्त पार्किंगवर पालिकेने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

----------------

ओल्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर

शिरोळ : सध्या उसाचा गळीत हंगाम सुरू असला तरी ओल्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. उसाला तुरे फुटल्याने उसापासून निघणारे वाढे निघत नसल्याने चाऱ्याची टंचाई निर्माण होत आहे, तर काही ठिकाणी ऊसतोडी मशीनद्वारे होत असून, त्या ठिकाणी वाढे तोडू देत नसल्याने पशुपालकांची मोठी गैरसोय होत आहे.

-

-------------------

काटेरी झुडपे हटवावीत

शिरोळ : येथील शिरोळ बंधारा ते जुना कुरुंदवाड रस्त्याच्या मार्गावर दोन्ही बाजूला काटेरी झुडपांचे साम्राज्य वाढले आहे. या काटेरी झाडाझुडपांमुळे वाहतुकीला अडथळा होत आहे. रात्रीच्या वेळेस याचा अंदाज येत नसल्याने अपघाताचीदेखील शक्यता आहे. त्यामुळे ही काटेरी झुडपे हटवावीत, अशी मागणी होत आहे.

----------------------------

Web Title: Short story