शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
2
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
3
IPL 2026 : LSG अभी जिंदा है...! गत चॅम्पियन RCB च्या संघाने पराभवासह 'नंबर वन'ची संधी गमावली
4
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
5
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
7
प्रिन्ससमोर 'किंग' चारीमुंड्याचित! अचूक टप्पा अन् काही कळण्याआधीच विराट कोहलीचा त्रिफळा उडला (VIDEO)
8
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
9
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
10
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
11
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
12
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
13
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
14
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
15
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
16
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
17
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
18
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
19
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
20
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
Daily Top 2Weekly Top 5

गणवेशाबाबत शिक्षकांकडून अल्प प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:24 IST

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या शिक्षकांसाठी गणवेश ठरवून दिल्यानंतरही त्याची अंमलबजावणी होत नसल्याने शिक्षण ...

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या शिक्षकांसाठी गणवेश ठरवून दिल्यानंतरही त्याची अंमलबजावणी होत नसल्याने शिक्षण सभापती प्रवीण यादव आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे सोमवारपासून जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. जिल्ह्यातून गणवेशाबाबत अल्प प्रतिसाद मिळत असून मोजक्या शाळांमध्ये शिक्षकांनी या आदेशाची अंमलबजावणी केल्याचे दिसून येत आहे.

जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना सोमवारी आणि मंगळवारी पिस्ता रंगाचा शर्ट आणि काळी पॅन्ट तर गुरुवारी, शुक्रवारी गुलाबी रंगाचा शर्ट व काळी पॅन्ट असा गणवेश ठरवून दिला आहे. बुधवार आणि शनिवार हे दोन दिवस कोणत्याही योग्य पोशाखास परवानगी देण्यात आली आहेत. महिला शिक्षकांसाठी करड्या रंगाचे हाफ जॉकेट बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, काही शिक्षक संघटनांनी या गणवेशांना विरोध केला आहे.

१ एप्रिलपासून सर्व शिक्षक, शिक्षिकांसाठी हा गणवेश बंधनकारक करण्यात आला. याच दिवशी शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांनी बाराही तालुक्यांतून किती शाळांमध्ये गणवेश वापरला आहे, याचे फोटो मागवले होते. मात्र, त्याला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. काही मोजक्या शाळांमधील शिक्षकांनी या आदेशाची अंमलबजावणी केली आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण सभापती प्रवीण यादव आणि आशा उबाळे हे वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये फिरतीसाठी जाणार आहेत.

०३०४२०२१ कोल झेडपी ०१

कागल तालुक्यातील गोरंबे येथील प्राथमिक शाळेच्या शिक्षकांनी गणवेश परिधान करून सूचनांचे पालन केले.