शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

चित्रपट महोत्सवात लघुपटांचा दिवस

By admin | Updated: December 29, 2016 00:24 IST

‘कि फ्फ’चा आज समारोप : ‘विक्रम गायकवाड’ यांना चित्रमहर्षी आनंदराव पेंटर पुरस्कार

कोल्हापूर : कमीत कमी वेळात जास्तीत जास्त आशय व्यक्त करीत तरुणाईच्या हातातील माध्यम असलेल्या ‘लघुपट’ विभागात विविध विषयांवरील कलाकृतींचे सादरीकरण हे बुधवारचे आकर्षण ठरले. महाराष्ट्र शासन पुरस्कृत कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटी व अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे राजर्षी शाहू स्मारक येथे दि. २२ डिसेंबरपासून सुरू असलेल्या पाचव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आज, गुरुवारी समारोप होत आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांना चित्रमहर्षी आनंदराव पेंटर पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. ‘ट्रॅक १४३’ या इराणी चित्रपटाने समारोप होईल.सात दिवसांपासून सुरू असलेल्या महोत्सवात माय मराठी विभागात विविध आशय, विषय असलेल्या कलाकृतींचे सादरीकरण झाले. त्यामध्ये प्रकाश कुंटे यांचा ‘सायकल’, सुनील सुखटणकर, सुमित्रा भावे यांचा ‘कासव’, दासबाबू यांचा ‘ब्रेव्ह हार्ट’, गिरीश विश्वनाथ यांचा ‘व्हेनिला स्ट्रॉबेरी अ‍ॅँड चॉकलेट’, संदीप दंडवते यांचा ‘भॉऽऽ’, विजयदत्त यांचा ‘माचीवरला बुधा’, निवास मोरे यांचा ‘कावळा’ या सात चित्रपटांचा समावेश होता. माय मराठी विभागात प्रेक्षक पसंती पुरस्कारासह, ज्यूरी अवॉर्डही देण्यात येणार असल्याने यामध्ये कोण बाजी मारणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. महोत्सवात बुधवारी विविध लघुपट व माहितीपटांचे सादरीकरण झाले. अमोल कचरे, हरीश कुलकर्र्णी व संतोष शिरगावकर यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘मेंढपाळ आणि मी’ या ३० मिनिटांच्या माहितीपटामधून मेंढपाळ आणि त्याच्या कुटुंबीयांच्या राहणीमानावर भाष्य करण्यात आले. त्यानंतर क्रिकेट आणि संगीताबद्दल विशेष आवड असणाऱ्या दोन अंध मुलांची कथा सतीश मुंडा दिग्दर्शित ‘दृष्टी’ या माहितीपटातून उलगडली. त्यानंतर एखाद्या गोष्टीकडे, घटनेकडे पाहण्याची, त्याबद्दल विचार करण्याची दृष्टी आपण स्वत:च विकसित करीत असतो. त्याला आपले पूर्वसुरींचे अनुभव अथवा ऐकीव गोष्टी कारणीभूत असतात. अशाच कथानकाभोवती फिरणाऱ्या ‘याकूब’ या नायकाभोवती हा लघुपट फिरत राहतो. १३ मिनिटांचा हा लघुपट एका विशिष्ट वर्गाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणाऱ्या मनोवृत्तीला हादरे देतो. स्वप्निल राजशेखर दिग्दर्शित ‘सावट’, जयंत सोमलकर यांचा ‘इयत्ता’, सोनम सिंग यांचा ‘अभिसारिका’, स्नेहा सोनवणे यांचा ‘तिची कथा’, अभिजित खुमन यांचा ‘कल्पवृक्ष’, विशाल कुंडले यांचा ‘ओपिंगे बेथिंगो’ यांसह विविध लघुपटांचे सादर झाले.(प्रतिनिधी)ज्येष्ठ साहित्यिक व राजदूत ज्ञानेश्वर मुळे यांच्यावर आधारित ‘जिप्सी’ या माहितीपटाचे बुधवारी विशेष प्रदर्शन करण्यात आले. त्याची निर्मिती युनिक अकॅ डमीने केली असून, दिग्दर्शन धनंजय भावलेकर यांचे आहे. मुळे यांच्या बालपणापासून ते आजपर्यंतच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणारा माहितीपट आकर्षण ठरला. अब्दुललाटसारख्या एका छोट्या खेडेगावापासून सुरू झालेला हा प्रवास जपान, रशिया, सीरिया, अमेरिका अशा देशविदेशांची सैर घडवून आणतो. हा थक्क करणारा प्रवास पाहून उपस्थित भारावले. प्रतिकूल परिस्थितीत निराश न होता संकटावर कशी मात करावी, असा सकारात्मक संदेश हा माहितीपट देतो.