दुकानदारांनी आरटीपीसीआर चाचणी करून घ्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:22 IST2021-05-24T04:22:24+5:302021-05-24T04:22:24+5:30

चंदगड : लॉकडाऊन उठण्यापूर्वी चंदगड तालुक्यातील सर्व दुकानदारांनी अँटिजन किंवा आरटीपीसीआर तपासणी करून घेतल्याशिवाय दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात येणार ...

Shopkeepers should take RTPCR test | दुकानदारांनी आरटीपीसीआर चाचणी करून घ्यावी

दुकानदारांनी आरटीपीसीआर चाचणी करून घ्यावी

चंदगड : लॉकडाऊन उठण्यापूर्वी चंदगड तालुक्यातील सर्व दुकानदारांनी अँटिजन किंवा आरटीपीसीआर तपासणी करून घेतल्याशिवाय दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात येणार नाही, अशी सूचना प्रांताधिकारी विजया पांगारकर यांनी दिली.

कोवाड (ता. चंदगड) येथील ग्रामपंचायतीत अधिकारी, कर्मचारी, कोरोना दक्षता कमिटी व आरोग्य विभाग यांच्या बैठकीत त्यांनी सूचना दिल्या. तहसीलदार विनोद रणावरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

आजपासून जिल्ह्याचा लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल करण्यात येत आहे. तालुक्यातील हॉटस्पॉट म्हणून घोषित व अन्य गावांतील किराणा, भाजी, मेडिकल, पिठाच्या गिरण्या, हॉटेल्स, खाणावळी, अशा जिथे ग्राहक जातात, अशा सर्व प्रकारच्या दुकानदार, विक्रेते व तेथील कामगारांनी आपली कोविड चाचणी करून घेणे बंधनकारक आहे.

प्रशासन व दक्षता कमिटीने सांगूनही याचे उल्लंघन केल्यास पोलीस खात्याच्या साहाय्याने अशी दुकाने सील केली जातील, असा इशारा प्रांताधिकारी पांगारकर यांनी यावेळी दिला. यावेळी मंडल अधिकारी शरद मगदूम, तलाठी दीपक कांबळे, ग्रामसेवक पाटील आदींसह व्यावसायिक उपस्थित होते.

Web Title: Shopkeepers should take RTPCR test